चोरट्यांचा धुमाकूळ; सुकूर, तोर्डमध्‍ये लाखोंची घरफोडी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

पर्वरी : खर्रे - सुकूर येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून दिवसाढवळ्या चार बंद सदनिका तसेच आल्त तोर्डा येथील एका घरात घुसून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. त्यामुळे या भागात खळबळ माजली असून भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. चोरांनी अंदाजे नऊ लाखांची चोरी केल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ६ वा.च्‍या सुमारास खर्रे सुकुर येथील गृहनिर्माण वसाहतीमधील चार सदनिकेतील लोक सकाळी कामाला निघून गेले असता आणि सायं. ६ वा.च्‍या सुमारास ते परत घरी असता सदनिकेचे दर्शनी दरवाजे उघडलेले दिसून आले. आत जाऊन पाहणी केली असता सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब झालेली आढळून आल्‍याची तक्रार सदनिका मालक अवनी अमित बांदेकर यांनी पर्वरी पोलिस स्थानकात नोंदवली आहे. दरम्यान, त्याच गृहनिर्माण वसाहतीत राहणारे सुरेश नाईक, सुलेश मापारी व मारिया मार्टिन यांच्याही घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल केल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

तसेच आल्त तोर्डा येथील प्रसाद फातर्पेकर यांच्या घरात कोणीही नसल्‍याची संधी साधून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू लंपास केल्या. हा चोरीचा प्रकार संध्याकाळी कामावरून घरी परतल्यानंतर तेथे राहणाऱ्या घरमालकाच्या लक्षात आला. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच उपनिरीक्षक दिनेश गडेकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्वानपथक व ठसेतज्‍ज्ञांना पाचारण करून तपास केला. परंतु, पोलिसांना काही धागेदोरे सापडले नाहीत. निरीक्षक निनाद देऊळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. 

संबंधित बातम्या