राज्यात आणखी ३ कोरोना संशयित सापडले

वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

पणजी : कोरोना व्हायरसच्या संशयावरून ब्रिटिश महिलेसह तिघांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या स्‍वतंत्र वॉर्डमध्‍ये (आयझोलेशन) दाखल केले आहे. या ब्रिटिश महिलेला आज तर इतर दोघांना त्यांच्या प्रवास पार्श्‍वभूमीवर काल दाखल करून घेण्यात आले आहे.

यापूर्वी संशयास्पद कोरोना व्हायरसप्रकरणी अलग ठवेलेल्या सर्व रुग्णांची करण्यात आलेली चाचणी नकारात्मक आली होती. या व्हायरसबाबत या इस्पितळात सर्व ती काळजी घेण्यात येत आहे.

आजपर्यंत गोव्यात कोरोना व्हायरस रोगाचे (कोविड) १९ रुग्ण गोमेकॉ इस्पितळात स्थापन केलेल्‍या ११३ वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी ४ जणांची चाचणी झाली आहे, तर दोघांच्या चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे. ज्यांची नकारात्मक चाचणी अहवाल आला आहे. त्यांना इस्पितळातून पाठवण्यात आले आहे. या व्हायरसची लक्षणे दिसत नाही, त्यांना घरी जाण्यास परवानगी दिले, तरी त्यांना घरात अलग राहण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत या व्हायरसबाबत काहीच चिंता करण्याची गरज नसून आवश्‍यक त्या उपाययोजना इस्पितळातर्फे घेण्यात येत असल्याची माहिती इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

‘कोरोना’चा निदान घेण्यास विद्यार्थ्यांनी केला ‘वेब ॲप’

कोरोना व्हायरसचे निदान करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गोव्यातील पाच विद्यार्थ्यांनी ‘वेब ॲप’ तयार केले आहे. या व्हायरसविषयीच्या प्रसाराची वेळेवर माहिती लोकांना मिळावी व या भयानक रोगापासून रक्षण व्हावे हे या ॲपचे मुख्य उद्दिष्ट आहे. पीसीसीई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे ॲप तयार केले आहे.

संबंधित बातम्या