त्‍या’ वाघाचा मृत्‍यू विषबाधेनेच

Dainik Gomantak
सोमवार, 6 जानेवारी 2020

पणजी

पणजी

सत्तरी तालुक्यातील गोळावली येथे मृतावस्थेत सापडलेल्या पट्टेरी वाघाचा मृत्यू हा विषबाधेने झाल्याचे वन खात्याने केलेल्या उत्तरीय तपासणीतून सिद्ध झाले आहे. वन खात्याचे मंत्री या नात्याने याचा अहवाल वन खात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केल्यावर ही माहिती उजेडात आली.
मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती उघड करतानाच याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. सत्तरीत २००९ मध्ये वाघाला मारून जाळण्यात आले होते. ‘गोमन्तक’नेच ते प्रकरण उजेडात आणले होते. मोठा दबाव असतानाही कर्तव्यदक्ष वनाधिकाऱ्यांनी त्याचा तपास करत जबाबदार असणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवले होते. सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सत्तरीतील गोळावली येथे पट्टेरी वाघ मृतावस्थेत मिळाल्यावर घातपाताची शक्यता वर्तवली जात होती. आता मुख्यमंत्र्यांनीच विषबाधा झाल्याचे स्पष्ट केल्याने वन खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर याला जबाबदार कोण? ते शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

संबंधित बातम्या