टोनी फर्नांडिस यांनी राजीनामा द्यावा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पणजी :  केंद्र सरकारने देशात लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व एनआरसी रद्द करण्यासाठी काँग्रेसच्या चळवळीला स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांनी पाठिंबा द्यावा किंवा त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी चिंबल येथे सांताक्रूझ काँग्रेस गट समितीतर्फे आयोजित सभेत करण्यात आली. चळवळीला पाठिंबा देण्यादर्भातचे निवेदन आमदारांना देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

या सभेत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, सीएए व एनआरसी या कायद्यांना विरोध करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांविरुद्ध बेकायदेशीर गुन्हा सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी दाखल केला आहे. यासंदर्भात भाजपचे मंत्री तसेच आमदार मूग गिळून आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील म्हणून ते आवाज उठवत नाहीत. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे व तेही बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेले आहेत, त्यामुळे ते पाठिंबा देण्यास खुलेआमपणे येत नाहीत असे डिमेलो म्हणाले.

५६ ग्रामीण भागांना शहराचा दर्जा

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते उर्फान मुल्ला म्हणाले की, टोनी फर्नांडिस यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे त्यांनी मतदारांच्या चळवळीला पाठिंबा देण्याची गरज आहे व मतदारांचा तो अधिकार आहे. मात्र, त्यांनी भाजप प्रवेश करताना मतदारांचा विश्वारसघात केला. त्यांच्या निवासस्थानी जाऊन सीएए व एनआरसी विरोधात पाठिंबा देण्याचे निवेदन देण्यासाठी सर्वांनी यावे असे आवाहन त्यांनी केले.

उत्तर गोवा जिल्हा कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस निसार मोहम्मद यांनी सांगितले की, कोणतीही कागदपत्रे कोणी विचारल्यास दाखवू नयेत. आम्ही भारतीय आहोत आणि ते सिद्ध करण्यासाठी आम्हाला दस्तऐवज दाखवण्याची गरज नाही. रुडॉल्फ फर्नांडिस यांनी हा कायदा त्वरित मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली.

बायंगिणी येथे कचरा प्रकल्प नकोच!

रुडॉल्फ फर्नांडिज, युवा नेत्या मिस शिन्नी ओलिवीरा, अनिता कुंडईकर, काँग्रेस गट अध्यक्ष जॉन परेरा यांनी सीएए व एनआरसी कायद्याचे परिणाम याची माहिती दिली. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, ग्लेन काब्राल, बॉबी शेख, सायमन कायादो उपस्थित होते.
 
संबंधित बातम्या