किनाऱ्यावर कासव संवर्धनाला वेग

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पणजी:काणकोणात पाच, तर पेडण्यात चार ठिकाणी कासवांनी घातली अंडी

पणजी:काणकोणात पाच, तर पेडण्यात चार ठिकाणी कासवांनी घातली अंडी

किनाऱ्यावर कासव येण्यास विलंब झाला असला तरी हळहळू कासव संवर्धनाला वेग येऊ लागला आहे. काणकोणमध्ये पाच ठिकाणी आणि पेडण्यात चार ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली आहेत.
राज्य सरकारने उत्तर गोव्यात पेडणे तालुक्यातील मोरझी व मांद्रे तर दक्षिण गोव्यात काणकोण तालुक्यातील आगोंद व गालजीबाग या ठिकाणी किनारपट्टीच्या नियमन विभागाच्या (सीआरझेड) २०११ च्या अधिसूचनेखाली किनाऱ्यावर कासवांच्या घरट्यांसाठी संरक्षित जागा ठेवल्या आहेत.देशात ओडिशा राज्यातील किनाऱ्यावर हजारो कासवांच्या घरट्यांच्या तुलनेत गोव्यात केवळ चार संरक्षित स्थळांवर सरासरी ५० ते ६० ठिकाणी अंडी घातली जातात.या ठिकाणांची जबाबदारी वनविभाग पाहतो.
मागील आठवड्यात गुरुवारी एक मादी कासव मांद्रेच्या आश्‍वे किनाऱ्यावर येऊन अंडी घालण्यासाठी खड्डा खोदल्याचे दिसून आले.त्याठिकाणी मादीने घातलेली अंडी अद्याप वनविभागाने सुरक्षित ठिकाणी संरक्षित केलेली नसल्याने अंड्यांची संख्या नेमकी कळू शकली नाही.परंतु किनाऱ्यावर उशिरा का होईना कासवांचे अंडी घालण्यासाठी येणे, ही सर्वात आनंददायी बाब समजली जात आहे.त्याशिवाय याच दिवशी मोरजी किनापट्टीच्या दक्षिणेच्या एका बाजूला एक कासवही नजरेस पडले.त्यानेही काही अंडी घातली असून, अशाप्रकारे मोरजीमध्ये तीन घरटी पकडून उत्तर गोव्यात चार ठिकाणी कासवांनी अंडी घातल्याची घरटी सापडली आहेत.
दरम्यान, दक्षिण गोव्यातील आगोंदा व गालजीबाग किनाऱ्यावर वनविभागाने कासवाने अंडी घातलेली पाच ठिकाणे संरक्षित केली आहेत.उत्तर गोव्यातील मोरजी येथे ४ जानेवारी रीजो कासवाने अंडी घातल्याची घटना नोंदली गेली आहे.राज्यातील या चार ठिकाणच्या अड्यांची संख्या सुमारे एक हजारच्या आसपास असून, ५५ दिवसांच्या कालावधीनंतर ते उबविली जातील, असे वनविभागाने सांगितले. २०१८-१९ मध्ये मोरजी व मांद्रे येथे २२ ठिकाणी कासवांनी सुमारे अडीच हजार अंडी घातली होती आणि त्यातून जन्माला आलेली दीड हजार पिले समुद्रात सोडण्यात आली होती.

राज्‍य सौर ऊर्जा निर्मितीकडे

संबंधित बातम्या