तांबडीसुर्लावासीयांनी जपली चोरोत्सवाची परंपरा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

तांबडीसुर्ला: तांबडीसुर्ला साकोर्डा परिसरातील तयडे, धारगे, तांबडीसुर्ला, कारेमळ व मातकण या गावात चोरोत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या चोरोत्सवात गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन पारंपरिक पद्धतीने हा सण अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येतो. तांबडीसुर्ला परिसरातील ग्रामस्थांनी ही परंपरा शेकडो वर्षांपासून जपली आहे.

तयडे गावातील श्री सातेरी केळबाय ब्राह्मणी मंदिराच्या प्रांगणात मुलांना आंब्याच्या पर्णांनी सजवतात. चोरांना फुलांच्या गजऱ्यांनी अलंकृत करत असून स्वसंरक्षणासाठी त्यांच्या हातात काठी देतात. चोरांना सजविल्यानंतर त्यांना गावातील कुलदेवतेच्या माणावर आणून देवीला सामूहिक गाऱ्हाणे घालून ढोल-ताशांच्या गजरात शिमगोत्सवातील पारंपारिक जती म्हणत गावातील प्रमुख महाजन गावकऱ्यांच्या घरी चोरांची सुवासिनीकडून जुन्या चालीरीतींनुसार मनोभावे पूजा करतात. यावेळी चोरांना अर्धा नारळ , ऐपतीप्रमाणे धन, खोबरेल दान करण्याची प्रथा अनंत काळापासून रूढ आहे.

गावात या प्रथेची काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. चोरांना घराघरांत फिरवून त्यांची पूजा करतात. दुपारच्या भोजनानंतर चोरांची आंघोळ उरकली की , संध्याकाळी गावकरी मंडळी कुलदेवतेच्या माणावर शिमगोत्सवाची सांगता करण्यासाठी एकत्र जमतात.
चोरोत्सवात मुली गौरीच्या बाळाचे गीत म्हणत त्याला घरांघरात जाऊन खेळवतात. हे चोरोत्सवाचे खास आकर्षण असते.
 
संबंधित बातम्या