वाहतूक खात्याकडून उत्तरे देण्यात तांत्रिक चूक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

आमदार ढवळीकर, मंत्री गुदिन्हो यांच्यात खडाजंगी

प्रश्‍नाला उत्तरे देताना तांत्रिक चूक झाल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रश्‍नाला सविस्तर महिन्याला जमा होणाऱ्या रस्ता कर महसुलाचे उत्तर देण्यात आले आहे. त्याला जोड दस्ताऐवज (ॲनेक्स्चर बी) आहे त्यामध्ये ही माहिती आहे, असे सांगितले.

पणजी : २०१६ ते डिसेंबर २०१९ पर्यंत वाहतूक खात्यात रस्ता कर जमा झालेल्या प्रश्‍नावर विधानसभेत अपूर्ण उत्तर देण्यात आले आहे, त्यात वाहतूकमंत्र्यांची चूक नाही तर वाहतूक खात्याने ही माहिती संगणकावर ‘अपलोड’ करताना तांत्रिक चूक झाली आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले.

यावेळी या प्रकरणावरून आमदार सुदिन ढवळीकर व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्यात खडाजंगी झाली. वाहतूक खात्याकडे महसूलसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर अपूर्ण उत्तर देण्यात आले आहे. यावरून हे प्रशासन प्रकाशाकडून अंधाराकडे जात असल्याचे हे उदाहरण आहे. या खात्याकडे आर्थिक वर्ष २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ व २०१९ ते डिसेंबरपर्यंत रस्ता करमधून किती महसूल जमा झाला असा प्रश्‍न विचारला असताना त्याचे सविस्तर उत्तर दिले गेले नाही, असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रश्‍नोत्तराचा तास सुरू झाल्यावर सभापतींच्या व मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

सभापती पाटणेकर यांचा हस्तक्षेप...
आमदार ढवळीकर म्हणाले की, मंत्री ज्या जोड दस्ताऐवजाबाबत सांगत आहे तो आमदाराला दिलेल्या उत्तरामध्ये नाही. मला देण्यात आलेल्या उत्तरामध्ये मंत्र्यांनी ते दाखवावे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. या जोड दस्ताऐवजाच्या माहितीवरून आमदार ढवळीकर व मंत्री माविन गुदिन्हो यांच्यात खडाजंगी होताच सभापती राजेश पाटणेकर यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाची संबंधित खात्याकडे चौकशी करतो असे सांगितले. जर आमदारांनी ही बाब आज विधानसभा कामकाज सुरू होण्यापूर्वी लक्षात आणून दिली असती तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना विचारता आले असते, असे सभापती म्हणाले.

म्हापशातील जिल्हा इस्पितळाचा दर्जा वाढविणे गरजे

वाहतूक खात्याकडून माहिती देताना घोळ...
विधानसभा कामकाज सुरू असताना काही वेळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाहतूक खात्याने माहिती देताना घोळ केल्याचे मान्य केले. मंत्र्यांनी ही माहिती देण्यासंदर्भात फाईलवर सही केली आहे तर वाहतूक खात्याने रस्ता कर महसूल प्रतिमहिना जमा झालेल्याची माहिती संगणकावर अपलोड केली नाही. ही तांत्रिक चूक या खात्याने केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित बातम्या