लोकलचे डबे घसरल्याने एका महिलेसह तीन प्रवासी जखमी

YT
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मुंबई : आज सकाळी लोकल रेल्वेचे सुमारे सहा डबे रुळावरून खाली घसरल्याने एका महि

मुंबई : आज सकाळी लोकल रेल्वेचे सुमारे सहा डबे रुळावरून खाली घसरल्याने एका महिलेसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. माहीमजवळ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही लोकल सीएसटीहून अंधेरीच्या दिशेने जात होती. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर माहिमजवळ रेल्वे रुळ बदलताना लोकलचे डबे रुळावरुन घसरले. ही लोकल ५ नंबरच्या फलाटावर येणार होती, त्यासाठी ७ नंबरच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ट्रॅकवरुन ५ नंबरच्या ट्रॅकवर जाताना लोकलचे सहा डबे रुळांवरून खाली घसरले.

माहीम स्थानक हार्बर व पश्चिम मार्गाला जोडते. या ठिकाणीच ही दुर्घटना घडल्याने लोकलची कोंडी झाली. गणेश चतुर्थीमुळे हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची फारशी वर्दळ नसली तरी लोकलमधून गणपती घरी आणणाऱ्या भाविकांची गैरसोय होता दिसत आहे.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

पोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे

गणेशाची व्रते 

उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक

शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी

खासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)

महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’

बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)

शांतता सुळावर? 

ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट 

संबंधित बातम्या