वन्य प्राण्यांच्या अस्तित्वासाठी वृक्षांची लागवड करणे गरजेचे - डॉ. शीतल आमटे 

aamte
aamte

पणजी:वन्य प्राण्यांच्या अस्तित्वासाठी
वृक्षांची लागवड करा: आमटे
विकासाच्या नावाने वृक्षांची बेसुमार कत्तल होत असल्यामुळे अभयारण्यातील जैवविविधता मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे.त्यामुळे वन्य प्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.तेव्हा वृक्षांची लागवड, जंगल निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे.याची जाणीव देऊन आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा थोर समाज सेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे करजगी यांनी माणूस व प्राण्यांपेक्षा झाडे कशी महत्त्वपूर्ण आहेत, हे स्पष्ट केले.
पिळर्ण औद्योगिक वसाहतींमधील म्युझियम ऑफ गोवा (मोग) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. शीतल यांच्याशी वामन धावरकर यांनी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.त्यांनी सहानुभूती पासून स्वानुभूतीपर्यंतचा प्रवास या प्रकट मुलाखतीतून उलगडून दाखविला.जपानच्या मियावाकी पध्दतीने वृक्षांची लागवड करून पारंपरिक वृक्षलागवडीच्या तुलतनेत दहा पटीने जलद वाढणारे आणि शंभर टक्के जगणाऱ्या झाडांचे प्रयोग आनंदवनात कसे यशस्वी रित्या राबविले याबद्दल सांगून डॉ. शीतल म्हणाल्या, जैवविविधतेने नटलेल्या या मानवनिर्मित जंगलांसाठी वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अंकिरा मियावाली यांनी हे तंत्र विकसित केले आहे.स्थानिक प्रजातींच्या झाडांमध्ये फळझाडे, फुलझाडे,उंच वाढणारी काटेरी झाडे असल्यामुळे नष्ट होत असलेल्या प्राण्यांचा व पक्षांचा अधिवास पुन्हा उभा राहू लागला आहे.
यासंदर्भात मुलांच्या अभ्यासक्रमात बदल होण्याची गरज डॉ. शीतल यांनी प्रतिपादीत केली.अनेकदा तरुणाईला काम करण्याची इच्छा असून सुरुवात कुठून करायची हे समजत नाही.सामाजिक कार्याबद्दलची आस्था असलेल्यांना मार्गदर्शनाखाली गरज आहे.तरुणांना वृक्ष लागवड, अवयवदान अमूर्त कला याद्वारे एकत्र आणता येईल असे त्या म्हणाल्या.मरणानंतर लोक तुम्हाला तुमच्या सीव्ही नुसार ओळखणार नाहीत,तर तुमच्या हातून घडलेल्या चांगल्या गोष्टींतून ओळखतील याची जाणीव देवून डॉ. शीतल यांनी आमटे आडनावामुळे आदर तर मिळतोच, परंतु फायद्याबरोबर तोटाही कसा होतो याबद्दलचे किस्सेही सांगितले.तसेच कुष्ठरोगाबद्दल लोकांच्या मनात अजूनही गैरसमज कसे आहेत हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com