पडीक देवस्थानांचा वारसा जतन व्हायला हवाः मुख्यमंत्री डाँ. प्रमोद सावंत

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : झाडानी-सत्तरी येथे बसवेश्वर पर्यावरण केंद्राचे उद्‌घाटन

झाडानी येथे बेलाच्या झाडाची लागवड करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व डॉ. प्रकाश पर्येकर.

झाडानी येथे बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूस सौ. सुलक्षणा सावंत, डॉ. प्रकाश पर्येकर व इतर

झाडानी येथे करमळी बुद्रुकचे पथक दिंडी सादर करताना.

 

वाळपई : सत्तरी तालुक्यात नगरगाव पंचायत क्षेत्रातील एकेकाळी ‘रेव्हेन्यू’ गाव म्हणून ओळखला जाणारा सध्या निर्मनुष्य असलेल्या झाडानी गाव येथे महाशिवरात्रीच्या शुभदिनी बसवेश्वर पर्यावरण केंद्राचे उद्‌घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बेल हे वनौषधी रोपटे मंदिराच्या प्रांगणात लागवड करून सावंत यांनी उद्‌घाटन केले.

पारंपरिक समई प्रज्वलित करून या केंद्राच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. वन्य जीव आणि वनस्पती यांचा अभ्यास करण्यासाठी या केंद्राद्वारे वनखात्याच्या सहयोग आणि सहकार्याने विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सदस्यांनी सांगितले. व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सौ. सुलक्षणा सावंत, झाडानी बसवेश्वर मंदिर समितीचे पदाधिकारी नकुळ वेळुस्कर, गोपिनाथ गावस, डॉ. प्रकाश पर्येकर, श्रीपाद केरकर, गणेश पर्येकर, सिताराम नाईक, बाबू नाईक आदींची उपस्थिती होती.

डॉ. प्रकाश पर्येकर म्हणाले, गेली वीस वर्षे झाडानी गावात महाशिवरात्र साजरी केली जाते. या झाडानी गावात कोणीही वास्तव्य करीत नाही. केवळ देवतांचे अस्तित्व आहे. या देवतांच्या मूर्ती संवर्धित राहण्यासाठी मंदिराच्या माध्यमातून लहानसा आसरा केला आहे. त्यातून झाडानी गावाचे अस्तित्व जीवंत राहणार आहे. आम्ही पर्यटनासाठी लाखो रुपये खर्च करतो. पण अशा जंगलातील आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या भागाचे संवर्धन आवश्यक आहे. झाडानी गावात मंदिर बांधून तेथील देवतांना आसरा देऊन संस्कृती जतनाचे महान काम केले आहे.
प्रास्ताविक श्रीपाद केरकर यांनी केले. सूत्रनिवेदन गोपिनाथ गावस यांनी तर आभार बाबू नाईक यांनी मानले. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, नागरिकांच्या स्थलांतरामुळे असो, अथवा गाव सोडून गेलेल्या गावातील पडीक देवस्थानांच्या वारसाचे जतन गावातच व्हायला हवे. शहरातील लोकांना या देवस्थानांची अथवा मूर्तींचे भेट घेण्यासाठी गावातच आमंत्रित करण्यात यावे. झाडांनी निर्मनुष्य गावात बसवेश्वराचे देवस्थान जसे इथे पडीक होते. ते ज्या प्रमाणे तिथेच पुर्नप्रतिष्ठापना करून त्याचे संवर्धन करण्याचा जो प्रयत्न श्री बसवेश्वर पर्यावरण संवर्धन केंद्राने केला आहे. तो वाखाण्यजोगा आहे. अनेक ठिकाणी अशी पडीक देवस्थाने आहेत व तिथे कोणीही रहात नाही. त्यांचेही संवर्धन व्हायला हवे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

जैव विविधता संवर्धन खाते, वन आणि निसर्ग संवर्धनाच्या कार्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या सगळ्या सरकारी कार्यालयांच्या सहकार्याने या पर्यावरण संवर्धन केंद्राला आपण सर्वतोपरी साहाय्य करणार आहे. येत्या जून महिन्यात या केंद्राला झाडानी गावासाठी या परिसरात एक हजार मोफत झाडे दिली जातील. केंद्राने ती झाडांनी परिसरात लागवड करून या स्थळाचे नैसर्गिक सौंदर्य द्विगुणित करावे. या पडीक बसवेश्वर देवस्थानाच्या विखुरलेल्या मूर्तींचे जतन आणि संवर्धन करून केंद्राने कौतुकास्पद कार्य केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिसरात निसर्ग संवर्धनाचे कोणतेही कार्य करण्यास वन खात्याचा मंत्री या नात्याने सहकार्य केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

केंद्राने या अस्ताव्यस्त पडलेल्या देवस्थानाच्या मूर्तींना पुर्नजीवीत केल्याने आता या मूर्ती पुढच्या पिढीसाठी संवर्धित होतील असे सावंत यांनी सांगितले. यावेळी म्हादई आणि पर्यावरण या विषयावर जागृती करण्यासाठी म्हादई प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपला निसर्ग आणि लोककला यांचा कसा मेळ साधला आहे, याचे ज्ञान उपस्थितांना व्हावे यासाठी लोककला सादरीकरण

कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात सोकारत, फुगडी, धालो, जत, कविता, गाराणे आणि दिंडीचे सादरीकरण करण्यात आले होते. तसेच खास निसर्ग आणि माणूस यांचे नाते दृढ होण्यास मदत व्हावी या हेतून डॉ. नितीन सावंत यांचे खास व्याख्यानाचे ही आयोजन करण्यात आले होते. तदनंतर रात्री पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सत्तरी आणि इतर भागातील तीस पर्यावरण प्रेमींचा विशेष सन्मानही करण्यात आला.

यावेळी करंझोळ, कुमठोळ, साट्रे, कृष्णापूर, उस्ते, सावर्डे, सोनाळ, वाळपई, ठाणे, शिरीनी, करमळी, सावर्शे, खडकी, कडवळ, नानोडा, धावे, कडतरी, दाबोस, कुडशें, ब्रह्माकरमळी, सालेली, म्हाऊस, मासोर्डे, कोपार्डे, पाली, चरावणें, गोळावली, माळोली, मेळावली, धारखंड, तार, साखळी, काणकोण, पणजी, पेडणे, फोंडा, डिचोली अशा अनेक गावातील बसवेश्वराचे भक्त मंडळी हजारो संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रा. समता गावस, प्रा. श्रद्धा राणे, प्रा. डॉ. राजन गाड, प्रा. डॉ. नितीन सावंत, डॉ. प्रकाश पर्येकर, प्रा. प्रसाद केरकर, प्रा. सुवर्णा नार्वेकर, प्रा. रमेश सिनारी, प्रा. महेश गावस, प्रा. तृत्पी मळीक, प्रा. शाम पेडणेकर, प्रा. सुनिता गांवकार, प्रा. एकनाथ मांद्रेकर, प्रा. महादेव सुतार, प्रा. नितीन नायक, प्रा. हेमंती परब, प्रा. रक्षमा साळकर, प्रा. श्राव्या नार्वेकर, शिक्षक नंदा माजीक, शुभदा डिचोलकर, रघुनाथ नायक, विठोबा गांवकर, नकूळ वेळूस्कर, प्रदिप गवंडळकर, नमन धावस्कर, गणेश पर्येकर, शंकर नायक, भिवा गांवकर, लाडको कुडतरकर, सचीन गावस, गोमेकोचे डॉ. अक्षय नाईक, डॉ. राजेंद्र गाड, डॉ. अर्चना गावकर आणि इतर उपस्थित होते.
स्वागत प्रा. प्रसाद केरकर तर आभार प्रदर्शन प्रा. बाबू नाईक यांनी केले. सूत्रसंचालन गोपीनाथ गांवस यांनी केले.

कदंब कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

सूत्रनिवेदन कलाकार नकुळ वेळुस्कर यांनी केले. रात्री मोर्ले गुळ्ळे येथील दशावतारी नाटक संपन्न झाले. यावेळी दिवस रात्रभर मिळून तीन हजार भाविक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.

विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
दरवर्षी प्रमाणे झाडानी येथे करमळी बुद्रुक या गांवच्या दिंडी पथकाने बसवेश्वराच्या मंदिरा समोर दिंडी सादर केली. तदनंतर ज्या लोकवेदाच्या अंतरंगात असलेल्या जैविक संपदेचा वारशाचे महत्व नागरीकांना उमजावे या हेतूने खास सोकारत, फुगडी, गाराणे, इतर गीते आणि म्हादईचे महत्व कवितांमधून सादर करण्यात आले. हजारभर नागरिकांनी या जैविक संपदेच्या वारशाचे महत्त्व सामावलेल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला

संबंधित बातम्या

फोटो फीचर