प्रयत्न वासांच्या संवर्धनाचा !

महेश बर्दापूरकर
बुधवार, 15 जानेवारी 2020

सर्च-रिसर्च: वास मनुष्याला घाणेंद्रियाच्या मदतीने मिळालेली अलौकिक देणगी आहे.प्रत्येक वस्तूला तिचा वास असतो.तसाच प्रत्येक शहराचाहि विशिष्ट वास असतो.काळाच्या ओघात हे वास लुप्त होताना दिसतात. उदाहरण द्यायचं तर,पूर्वी पहिलाच पाऊस पडताच सर्वत्र मृदगंध दरवळायचा.आता रस्त्याच सिमेंटीकरण झाल्याने हा वास इतिहासजमा होत चालला आहे.

सर्च-रिसर्च: वास मनुष्याला घाणेंद्रियाच्या मदतीने मिळालेली अलौकिक देणगी आहे.प्रत्येक वस्तूला तिचा वास असतो.तसाच प्रत्येक शहराचाहि विशिष्ट वास असतो.काळाच्या ओघात हे वास लुप्त होताना दिसतात. उदाहरण द्यायचं तर,पूर्वी पहिलाच पाऊस पडताच सर्वत्र मृदगंध दरवळायचा.आता रस्त्याच सिमेंटीकरण झाल्याने हा वास इतिहासजमा होत चालला आहे.
हे विशिष्ठ वास काळाचा ओघात लुप्त होत असताना त्यांच संवर्धन करणे शक्य आहे काय,यावर संशोधन विचार करत आहेत.तुम्ही एखाद्या खूप जुन्या ,पान पिवळ्या पडलेल्या पुस्तकाची कल्पना करा.हे पुस्तक कपाटातून बाहेर काढून वाचायला सुरुवात करण्याआधी एक अनोखा जुन्या पुस्तकाला येणारा वास तुमच्या नाकात भरुन राहतो.हा वास केवळ ग्रंथालय अथवा जुन्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तक वाचणाऱ्यांची गरज नसून,त्याला मोठा सांस्कृतिक वारसाही आहे.हे वास.हे वास काळाच्या ओघात नष्ट होण्याची भीती आहे.जुनी पुस्तके नष्ट केली जातात किंवा तापमान नियंत्रण खोलीमधील सुरक्षित कपाटात कुलूपबंद होतात. आपल्याला साथ करणारे हे वास काळाबरोबर बदलत असल्याने पुस्तकांच्या वासा प्रमाणे शहरांचे विशिष्ट वासही लुप्त होण्याची भीती आहे.'युसीएल इन्स्टिट्यूट ऑफ सस्टनबल हेरिटेज 'मधील संशोधिका सिसिलिया बेंबीब्रे  हे लुप्त होणारे वास जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.मनुष्य आपल्या समृद्ध वारसाकडं कायम दुर्लक्ष करतो. सांस्कृतिक वारसाच्या जतनासाठी विविध दालन संग्रहालय असतात.मात्र त्यांचा उद्देश वस्तूंना दृश्य स्वरूपात जतन करण्याचा दिसतो.मला मात्र अत्यंत कमी संशोधन झालेला वास या मानवाला त्याच्या घाणेंद्रियाकडून मिळालेल्या वारसावर संशोधन करायचं आहे.हे वास या मानवाला त्याच्या घाणेंद्रियाकडून मिळालेल्या वारसावर संशोधन करायचं आहे. हे वास साठवून ठेवण्यासाठी पॉलिमर च धागा त्या वसाच्या संपर्कात आणला  जातो.वस्तूला वास देण्याची संबंधित हवेतील रसायन त्यावर चिकटतात.मी त्या धाग्याचे प्रयोग शाळेत पृथक्करण करून ते रसायन वेगळे करून त्याची ओळख पटते.दुसऱ्या पद्धतीमध्ये वस्तूच्या वायू स्वरूपातील वासाठी घटक शोधून वेगळे केले जातात.
ही पद्धत परफ्युम ,अन्न व पेयांच्या उद्योगांमध्ये वापरली जाते. तिसरा पर्याय थेट मानवी नाकाचा उपयोग करणं आहे.आम्ही वासाचं वर्गीकरण मनुष्याच्या दृष्टिकोनातून करतो.कारण एखादा वास भविष्यासाठी साठवून ठेवायचा असल्यास त्याच्या रासायनिक रचने बरोबरच आपला अनुभवही महत्त्वाचा ठरतो.या प्रक्रियेतून आम्ही चांबड्याचे मोजे,जुनी पुस्तक व साच्यां सारख्या वस्तू मधील वास साठवले आहेत अशी माहिती बेंबीब्रे देतात.
वस्तूप्रमाण शहराचाही एक विशिष्ट वास असतो आणि तो जतन करण्याचा प्रयत्न स्पेन,कोलंबिया,ग्रीस,फ्रान्स ,जपान आदी देशांनी केला आहे.यातून मानवी सभ्यतेचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.कॅट मॅक्लेन या संशोधिका स्मेलमॅप तयार करण्याचं ध्येय ठेवून काम करीत आहेत.यामध्ये शांघाय शहरातील रस्त्यांवर चा सकाळ दुपारचा वास किंवा शहराचा उन्हाळ्यातील वास किंवा एखाद्या शहराचा जुन्या काळातील वास साठवून त्यात काळानुसार कसे बदल होत गेले याचंही चित्र मांडलं जाणार आहे.भावी पिढ्यांसाठी जुन्या काळातील वस्तू आणि शहरांचे वास साठवून सांस्कृतिक वारसा जपण्याचा हा अनोखा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय म्हणायला हवा.

संबंधित बातम्या