समुद्रमार्गे गोव्याची सीमा पार करण्याचा प्रयत्न

Dainik Gomantak
मंगळवार, 28 एप्रिल 2020

पोळे चौपाटीवर लॉकडाऊन झाल्यापासून हा नित्याचाच प्रकार झाला असल्याचे पोळे येथील काही नागरिकांनी सांगितले.

काणकोण

लॉकडाऊन काळात पोळे येथे राज्याची सीमा सील केली असताना पोळ्या किनाऱ्यावरून समुद्रमार्गे गोव्याची सीमा पार करण्याचा प्रयत्न काही कर्नाटकातील नागरीकानी केला.त्यामध्ये काही महिलाचा समावेश होता.येथील एक जागरुक नागरीक दिपक पागी व सहकाऱ्याच्या  सतर्कतेमुळे २४ एप्रिलचा हा प्रयत्न सफल झाला नाही. पोळे चौपाटीवर लॉकडाऊन झाल्यापासून हा नित्याचाच प्रकार झाला असल्याचे पोळे येथील काही नागरिकांनी सांगितले. पोळे किनाऱ्यावर एका सुमो गाडीतून सुमारे दहा माणसे किनाऱ्यालगत उतरली तेथून ती मोटार बोटने समुद्र मार्गे कारवारला जाणार होती. मात्र दिपक पागी यानी पोलिसांना याची माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस येत असल्याची चाहूल लागताच काहीनी काळोखाचा फायदा घेत तेथून पोबारा केला मात्र दोन महिला तेथेच अडकून पडल्या.तटरक्षक दलाच्या पोलिसांनी दोन महिलासह तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली ते माजाळी येथील असून ते सद्या कामानिमित्ताने पिळर्णी-वेर्णा येथे राहत होते त्यांना पुन्हा पिळर्णी- वेर्णा येथे पोचवण्यात आले आहे असे काणकोणचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितले.

या संदर्भात दिपक पागी याना फोनवर धमक्या देण्यात येत असून फोन रिकॉर्डींग त्यानी पोलिसांना देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.फोनवरून  मारहाण करण्याची धमकी वारंवार देण्यात येत आहे त्यासाठी त्वरीत या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संबंधित बातम्या