राज्‍यात हळदीवरील संशोधनाला प्राप्‍त होणार वेग

Dainik Gomantak
बुधवार, 29 जानेवारी 2020

पणजी, 
राज्‍यात हळद लागवड करणारे हौशी शेतकरी आहेत. राज्‍यातील प्रत्‍येक घराच्‍या परसात हळदीचे रोपे लावलेली पहायला मिळतात, कारण गोमंतकीय जेवणात हळदीसह हळदीच्‍या पानांना वेगळे महत्त्‍व आहे. राज्‍यात असणारे हळदीचे हेच महत्त्‍व अधोरेखित करून केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था आता हळदीच्‍या लागवडीला प्रोत्‍साहन देण्‍याहेतू आणि संशोधनासाठी स्‍वतंत्र विभाग सुरू करणार आहे. हा विभाग जुने गोवा येथे असणार्‍या संस्‍थेच्‍या परिसरातच सुरू होणार आहे. 

गोव्‍यातील मातीमध्‍ये उत्तम पिके उत्‍पादीत करण्‍याची क्षमता आहे. तसेच येथील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करण्‍यासाठी उत्‍सुक आहे. हळदीचे राज्‍यातील उत्‍पादन वाढवे आणि राज्‍यातील शेतकर्‍यांनी हळद लागवडीचे प्रयोग करून पहावेत म्‍हणून हा उपक्रम संस्‍थेत सुरू करण्‍यात येणार आहे. 
ही संस्था हळदीच्या विविध गुणधर्मांवर अभ्यास करीर आहे जसे की लागवडीखाली असणार्‍या क्षेत्रफळाचा अंदाज, उत्पादन क्षमता आणि प्रत्येक हेक्टर उत्पन्नाचा अंदाज यासारख्‍या बाबी संशोधकांच्‍या माध्‍यमातून अभ्‍यासिल्‍या जात आहेत. लागवडीसाठी लागणारे महत्त्‍वाचे तंत्रज्ञानही संस्‍थेमार्फत उपलब्‍ध करून दिले असल्‍याची माहिती संस्‍थेचे संचालक एकनाथ चाकूरकर यांनी दिली.
अत्‍मा हि संस्‍था हळदीचे अधिकाधिक उत्‍पादन राज्‍यात व्‍हावे म्‍हणून नेहमीच कार्यशील आहे. आयसीएआर या संस्‍थेने हळदीच्‍या प्रतीभा नावाच्‍या प्रकाराच्‍या लागवडीबाबत आम्‍हाला सुचविले आहे. आम्‍ही विविध मार्गांतून शेतकर्‍यांना माहिती देण्‍याचा आणि त्‍यांच्‍यात जनजागृती करण्‍याचा प्रयत्‍न करीत असतो. प्रतीभाच्‍या नमुन्‍यांचे वाटप आम्‍ही शेतकर्‍यांपर्यंत मे महिन्‍यापर्यंत पोहचवू. लवकरच आम्‍ही कर्नाटक आणि केरळ येथे घेण्‍यात येणार्‍या उत्‍पादनाचाही अभ्‍यास करणार असल्‍याची माहिती अत्‍माचे उत्तर गोव्‍याचे प्रकल्‍पअधिकारी दिलीप परांजपे यांनी दिली. तसेच हा प्रयोग आम्‍ही आमच्‍या संस्‍थेच्‍या परिसरातही लागवड करून करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या