बारा सलून व्यावसायिक, कामगारांना अटक -सुटका

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

बारा सलून व्यावसायिक,  कामगारांना अटक -सुटका 

सासष्टी, 

टाळेबंदी सुरू असताना जमाव करून १४४ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी बुधवारी सकाळी एकूण बारा सलून व्यावसायिक, कामगारांना अटक केली. नंतर संध्याकाळी उशिरा प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या जामिनावर सर्वांची सुटका करण्यात आली.
सलून व्यवसायिकांनी टाळेबंदीमुळे आर्थिकरित्या फटका बसत असल्यामुळे बुधवारी सकाळी मडगाव पालिकेच्या उद्यानाच्या खुल्या जागेत बैठक घेतली होती. यावेळी बैठकीदरम्यान जमाव करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी एकूण १२ जणांना अटक केली. मडगाव सलून मालक संघटनेचे अध्यक्ष लॉरेल आब्रांचिस, चंद्रकांत खानापूरकर, परेश बोरकर, दयानंद साखळकर व अन्य आठ जणांचा यात समावेश आहे. उशिरा जामिनावर यांची सुटका करण्यात आली.

 

goa goa goa 

संबंधित बातम्या