आग्वाद तुरुंगाच्या सुशोभिकरणासाठी पंचवीस कोटी मंजूर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

पुरातन कोरीव कामांचे जतन करण्याचे मंत्री मायकल लोबो यांचे आश्वासन

आग्वादच्या तुरुंगाच्या सुशोभिकरणाची पाहाणी करताना मंत्री मायकल लोबो, सोबत सरकारी अधिकारी व स्थानिक पंचायत मंडळ.

कळंगुट : पंचवीस कोटी खर्च करून सिकेरी-आग्वादच्या पुरातन तुरुंग तसेच किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी आज (गुरुवारी) सकाळी सरकारी अधिकाऱ्यांसमवेत येथील कामाची पाहणी केली.

किल्ला लवकरच जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, कळंगुटचे सरपंच फान्सिस रॉड्रिगीश, तुरुंगाधिकारी एलन परैरा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री मायकल लोबो यांनी नवीनीकरणाच्या कामाचे सरकारी अधिकाऱ्यांसमवेत स्वत: फिरून निरीक्षण केले. तुरुंग अधिकाऱ्यांना याबाबतीत सुचना केल्या. येथील तुरुंगाच्या मुख्य भिंती तसेच त्यावरील कोरीव काम तसेच तेथील कपेल आणी मंदिर यांना कुठलीही हानी न पोहोचू देता तुरुंगाचे सुशोभिकरण करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे मंत्री लोबो यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या जीवनाची धुळधाण केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ तुरुंगाच्या भिंतीवर स्वातंत्र्य संग्रामातील आठवणींवर कोरीव काम करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री लोबो यांनी दिली.

 

 

आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न

संबंधित बातम्या