कोरोनाचे आणखी दोन संशयित सापडले

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

पणजी: देशात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने भीतीचे सावट राज्यातही पसरले आहे. शनिवारी आणखी दोन कोरोना संशयित रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे दाखल करून घेण्यात आले आहे. या दोन संशयित रुग्णांपैकी एक रुग्ण नेपाळी, तर दुसरा ब्रिटनचा पर्यटक आहे.

या दोन रुग्णांचे अहवाल तसेच दोन दिवसांपूर्वी भरती झालेल्या दोन अशा एकूण चार संशयित रुग्णांचे अहवाल सोमवारी मिळणार असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. याबाबतीत घाबरण्याचे कारण नसून आरोग्य खाते सतर्क असल्याचा संदेशही खात्याने दिला आहे.

राज्‍यात कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये म्‍हणून शक्‍य ती सर्वप्रकारची खबरदारी घेतली जात आहे. विमानतळ व्‍यवस्‍थापनाने आरोग्‍य तपासणी सक्‍तीची केली असून यासाठी वेगळ्या टीमची व्‍यवस्‍था केली आहे. शिवाय गोवा वैद्यकीय महाविद्यालय, चिखली आरोग्‍य केंद्र आणि मडगाव येथील हॉस्‍पिसिओ रुग्‍णालयात संशयित रुग्‍णांसाठी स्‍वतंत्र कक्ष ठेवण्‍यात आले असून तेथे सर्वप्रकारची यंत्रणा उपलब्‍ध आहे.

मोबाईल रिंगटोनद्वारे जनजागृती
कोरोनाग्रस्‍त रुग्‍णांची नोंद देशात झाल्‍यानंतर लगेचच केंद्र सरकारसह प्रत्‍येक राज्‍यातील राज्‍य सरकारही सतर्क झाले आहे. मोबाईल कंपन्‍यांनीही त्‍यांची जबाबदारी लक्षात घेत कोरोनाबाबत जनजागृती करणाऱ्‍या रिंगटोन लावल्‍या आहेत. यामुळे वारंवार कोणालाही फोन केला की लोकांना स्‍वच्‍छता आणि कोरोनापासून बचाव होण्‍यासाठी घ्‍याव्‍या लागणाऱ्‍या खबरदारीची आठवण करून दिली जात आहे.

कुवेतकडून आंतरराष्‍ट्रीय विमानांवर बंदी
कोरोनाबाबतची सतर्कता म्‍हणून कुवेत सरकारने आंतरराष्‍ट्रीय विमानांवर बंदी आणली आहे. कुवेतला जाणाऱ्या बांग्‍लादेश, फिलिपाईन्‍स, भारत, श्रीलंका, सिरिया, इजिप्‍त या देशातील विमानांना बंदी असल्‍याचे पत्रक कुवेत सरकारने जारी केले आहे.

संबंधित बातम्या