कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पणजी: कोरोना व्‍हायरस संबंधित संशयित रुग्‍णाच्‍या आरोग्‍याचा अहवाल नकारात्‍मक आल्‍यानंतर राज्‍यात आणखी दोन संशयित रुग्‍ण सापडले आहेत. या दोन्‍ही रुग्‍णांना गोमेकॉतील कोरोना उपचार विशेष विभागात ठेवण्यात आले असून त्यांच्‍याही रक्‍ताचे नमुने पुण्‍यातील प्रयोगशाळेत तपासण्‍यासाठी पाठविल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. हे दोन्‍ही रुग्‍ण महिला असून त्या चीनहून गोव्‍यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी चीनहून गोव्‍यात आलेल्‍या एका प्रवाशामध्‍ये अशाप्रकारची कोरोनाबाबतची लक्षणे दिसून आली असता त्याच्‍याही रक्‍ताचे नमुने पुणे येथे चाचणीसाठी पाठविण्‍यात आले होते. मात्र, चाचणीचा अहवाल नकारात्‍मक आल्‍यानंतर लोकांना थोडासा दिलासा मिळाल्‍यासारखे वाटले होते. या रुग्‍णाला शुक्रवारी उपचार पूर्ण झाल्‍यानंतर घरी जाण्‍यासाठी परवानगी देण्‍यात आली.

राष्ट्रीय स्पर्धा सुविधांचा सार्वजनिक वापर व्हावा

त्‍यानंतर शनिवारी दुपारी पुन्‍हा दोन संशयित मिळाल्‍याने लोकांत भीती निर्माण झाली होती. राज्‍यातील सर्व खासगी तसेच सार्वजनिक रुग्‍णालयात कोरोना व्‍हारसबाबत सतर्कता बाळगण्यच्या सूचना राज्‍य आरोग्‍य खात्‍याकडून पाठविण्‍यात आल्‍या होत्‍या. त्यामुळे वेळेचे भान लक्षात घेत या दोन्‍ही व्‍यक्‍तींना खासगी रुग्‍णालयातून गोमेकॉत हलविण्‍यात आले आहे. राज्‍यातील विमानतळावरही थर्मल स्‍क्रिनिंग सुरू करण्‍यात आले असून यासाठी वेगळा विभाग आहे.

कोरोनाबाबत उपचारासाठी गोमेकॉत ३० खाटांचा स्‍वतंत्र विभाग, तर चिखली येथे ७ खाटांचा स्‍वतंत्र विभाग असून संशयित रुग्‍णांना येथेच ठेवण्‍यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, या दोन्‍ही रुग्‍णांच्‍या रक्ताच्या चाचणीचा अहवाल सोमवारी सायंकाळी उशीरा अथवा मंगळवारी सकाळी मिळणार आहे. 

चीन येथे काम करणारी २७ वर्षीय महिला आणि तिच्या मैत्रिणीच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांना ताप आणि श्वसन यंत्रेणेला त्रास होत असल्याने आम्ही तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. लोकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नसून आरोग्य खाते जनतेच्या हितासाठी नेहमीच सतर्क आहे.
- विश्वजित राणे (आरोग्यमंत्री)

संबंधित बातम्या