हल्याळ अपघातात दोन युवक जागीच ठार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

हल्याळ:हल्याळ येथे बस आणि दुचाकी वाहनामध्ये झालेल्या अपघातात दोघे युवक जागीच ठार झाल्याची घटना केसरोळी ग्रामपंचायत व्याप्तीतील हलशी ग्रामाजवळ असलेल्या गोरीखन पेट्रोल पंप जवळ घडली.तालुक्यातील तट्टीगेरा ग्रामातील युवक मंजुनाथ मुन्नप्पा मिराशी (२२) आणि मागील सवार शिवाजी रामचंद्र मिराशी (२१) अशी ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.

शुक्रवारी दुपारी मृत युवक आपली दुचाकी वाहन सोबत (क्रमांक के.ए ६५ ई ६२६८) वरून केसरोळीच्या दिशेकडे जात असताना समोरून येणाऱ्या (के.ए ४२ एफ १२८६) बस वाहनचालक उळवप्पा बसप्पा हड्पद (रा.सोमंन कोप्पा, ता. कलघटगी)केसरोळीकडून हल्याळ दिशेकडे अतिवेगाने जात होता.गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूने हल्याळहुन केसरोळी दिशेकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनस्वार मंजुनाथ मिराशी आणि शिवाजी मिराशी यांना धडक दिली.यात ते ठार झाले.
या घटनेची माहिती मिळताच हल्याळ पोलिसांनी धाव घेऊन घटनेची पाहणी केली.याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास करीत आहेत.
 
राज्यात लवकरच मधमाशी पालन योजना

संबंधित बातम्या