साळगावात भूमिगत वीजवाहिन्‍या

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

कळंगुट:१३.७२ कोटी खर्चाच्‍या कामाची वीजमंत्री काब्राल यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन
साळगाव मतदार संघातील सांगोल्डा, साळगाव व पिळर्ण ग्रामक्षेत्रातील ११ केव्हीए फिडरच्या बदली १३.७२ कोटी रुपये खर्च करून भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येतील तसेच नवे ट्रान्सफॉर्मर व कंडक्टर बसविण्यात येतील, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी साळगाव येथे सांगितले.साळगाव येथे भूमिगत वीजवाहिन्या घालण्याच्या कामाचे उद्‍घाटन केल्‍यानंतर वीजमंत्री बोलत होते.

यावेळी साळगावचे आमदार जयेश साळगावकर, वीज खात्याचे मुख्य अभियंता रघुवीर केणी, साळगाव सरपंच श्रद्धा बोरकर, जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक, वैशाली सातार्डेकर, पंचसदस्य व ग्रामस्‍थ उपस्थित होते.
नीलेश काब्राल म्हणाले की, पर्वरी, सांगोल्डा ते पिळर्ण दरम्यान १४.५ किलोमीटर लांबीची भूमिगत वाहिनी घातली जाणार असून या ६०० वीज खांबे उभारणार, तसेच २१ नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले जाणार आहेत.वीज खांबे उभारण्यासाठी लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.लोकांनी सहकार्य केले, तर वीज खात्याला प्रकल्प एका वर्षात पूर्ण करणे सहज शक्य होईल.रस्त्यावरील एलईडी बल्ब संदर्भात काब्राल म्हणाले की, राज्य सरकार लवकरच वीज धोरण तयार करणार आहे.लोकांनी आपल्या घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवावेत.सौर ऊर्जा पॅनल बसविल्यास सरकार ५० टक्के अनुदान देते. ही योजना मर्यादित काळापुरती आहे.काब्राल यांनी प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले.सहाय्यक वीज अभियंता सुभाष पार्सेकर यांनी सूत्रसंचालन केले.सरपंच श्रद्धा पुरकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या