निसर्गरम्य मात्र, विकासाच्या प्रतीक्षेत खोर्जुवे

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

कोलवाळ:बार्देश तालुक्‍यातील हळदोणा मतदारसंघातील पर्यटनाच्या दृष्टीने मोलाचं असं खोर्जुवे गाव निसर्गाच्या सांनिध्यात पर्यटकांना नैसर्गिक आकर्षण असलेले खोर्जुवे बेट विकासाच्या प्रतीक्षेत आहे.चारही बाजूंनी पाणी आणि निसर्गसंपन्न असे खोर्जुवे बेट.पर्यटनाच्या क्षेत्राला बराच वाव आहे. पर्यटकांना समुद्र किनाऱ्याबरोबर निसर्गसंपन्न अशा पर्यटनस्थळांचे आकर्षण असते.

कोलवाळ:बार्देश तालुक्‍यातील हळदोणा मतदारसंघातील पर्यटनाच्या दृष्टीने मोलाचं असं खोर्जुवे गाव निसर्गाच्या सांनिध्यात पर्यटकांना नैसर्गिक आकर्षण असलेले खोर्जुवे बेट विकासाच्या प्रतीक्षेत आहे.चारही बाजूंनी पाणी आणि निसर्गसंपन्न असे खोर्जुवे बेट.पर्यटनाच्या क्षेत्राला बराच वाव आहे. पर्यटकांना समुद्र किनाऱ्याबरोबर निसर्गसंपन्न अशा पर्यटनस्थळांचे आकर्षण असते.
खोर्जुवे गाव चारही बाजूंनी पाण्याने वेढला असल्यामुळे विकासाच्या सहजपणे साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी वाहतुकीची सोय असणे. अत्यंत आवश्‍यक आहे. ५० वर्षांपूर्वी फक्त होडीतून खोजुर्वे बेटावर जाणे शक्‍य होते. पावसाळ्यात पुरामुळे होडीसेवा बंद करण्यात येत असे. काही वर्षानंतर हळदोणे ते खोर्जुवे अशी फेरी सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे लोकांना म्हापसा शहरात येणे बरेच सोयीचे झाले.पणजीहून खोर्जुवे बेटापर्यंत जलमार्गाद्वारे बिठ्ठोण, एकोशी, पोंबुर्फा, हळदोणा अशी फेरीसेवा (वाफोर) प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी ठरावीक वेळी फेऱ्या मारत असे. त्यामुळे जलमार्गाद्वारे वाहतुकीची सोय करण्यात आली होती. पणजी ते हळदोणापर्यंत व म्हापसा असे रस्त्यांचे डांबरीकरण केल्यानंतर वाहतुकीची सोय करण्यात आली होती. हळदोणा खोर्जुवे नदीवर केबलपूल बांधल्यानंतर लोकांना थेट खोर्जुवे गावात जाण्याची सोय झाली नाही. मये नदीवर पूल बांधल्यामुळे डिचोली- मये- खोर्जुवे अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
खोर्जुवे गावातील बरेच लोक मासेमारी व शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करीत असतात. खोर्जुवे गावात पर्यटन क्षेत्राचा विकास केल्यास अनेक व्यवसाय सुरू करण्यास लोकांना संधी उपलब्ध होऊ शकते. खोर्जुवे नदीवर बांधलेला केबल पूल व खोर्जुवे बेटावरील पुरातन किल्ला पर्यटकांसाठी आकर्षण आहे. पर्यटकासाठी विविध सेवा सुविधा या भागात उपलब्ध केल्यास खोर्जुवे गावाचा पर्यटनांच्या दृष्टिकोनातून विकास साधण्यासाठी बरीच मदत होणार आहे.गावातील लोकांना आपले लहान मोठे उद्योग पर्यटनाद्वारे सुरू करण्याच्या संधी मिळणार आहेत. पर्यटकांसाठी जलमार्गावर लहान बोटी सुरू केल्यास पर्यटकांना जलसफरीचा आनंद घेता येणार आहे. तसेच खोर्जुवे किल्ला हेरीटेज टुरीझमच्या दृष्टिकोनातून विकास केल्यास पर्यटकांना निवासाची उत्तम सोय होणार आहे. पर्यटकांच्या ओघामुळे गावातील लोकांना पर्यटकांसाठी अनेक व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

अहो सांगा आम्ही कसे जगायचे ? सांगा ना .!
खोर्जुवे गावाचा विकास साधण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना खोर्जुवे गावात राबवणे शक्‍य आहे. पर्यटन खात्यातर्फे अतिशय सुंदर अशी निवासस्थाने बांधल्यास पर्यटकांना बेटाच्या बाजूला असलेल्या पाण्यात जलाशय पाहण्यास मिळेल. पर्यटनाला चालना दिल्यास खोर्जुवे बेटावरील निसर्ग सौंदर्य पर्यटकांचे आकर्षण ठरेल. खोर्जुवे बेटावर पर्यटनाचे केंद्र उभारल्यास जैवसमृद्धीचा अभ्यास करण्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने मोलाचे आहे.
पाण्यातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी पर्यटकांना खोर्जुवे बेटावर जलचर प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी जलाशय तयार केल्यास देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खोर्जुवे बेट योग्य ठिकाण असल्याचे दिसून येत आहे.
खोर्जुवे बेटावर निसर्गाच्या सांनिध्यात अनेक देवस्थाने आहेत. सातेरी देवीचे मंदिर मुख्य देवस्थान म्हणून गावात प्रचलित आहे. वार्षिक देवस्थानचा वाढदिवस व वार्षिक भजनी सप्ताह दरवर्षी साजरा करण्यात येतो.
खोर्जुवे गावातील प्रत्येक वाड्यावर भजनांची मैफली व ट्रीकसीनचे देखावे करण्यात येतात.यावेळी खोर्जुवे बेटाला जत्रेचे स्वरूप आलेले असते.

पशुखाद्यावरील दरवाढ मागे घ्या

संपूर्ण गावात रोशणाई करण्यात येते. तसेच मंदिरावर विद्युत रोशणाई करण्यात येते. गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांच्या मैफली प्रत्येक वाड्यावर आयोजित करण्यात येतात. भाविक मोठ्या श्रद्धेने ब्राह्मण देवस्थान हजेरी लावतात व तीर्थप्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात. ब्राह्मण देवाच्या मंदिराचे नूतनीकरण करून आकर्षक बांधकाम करण्यात आले आहे. खोर्जुवे वाड्यावर असलेल्या हनुमान राष्ट्रोळी पंचायतन देवस्थानात वार्षिक हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच नाट्य प्रयोग सादर करण्यात येतात. भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून शनिवारी लोक आवर्जून हजेरी लावतात. पर्यटनाच्या दृष्टीने खोर्जुवे गावाचा विकास केल्यास भविष्यात खोर्जुवे बेटाचा कायापालट होऊन आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटण्यास मिळणार आहे

 

संबंधित बातम्या