‘सीएए’विरोधात एकजूट व्हावी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पणजी:गोकुवेधचे आदिवासी समाजाला आवाहन
केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या नागरिक दुरुस्ती कायद्याचा (सीएए) व ‘एनआरसी’चा परिणाम आदिवासी समाजावर होणार आहे.या कायद्यामुळे या समाजाची ओळख, स्वतंत्र तसेच जीवन असह्य होणार असल्याचा दावा गावडा, कुणबी, वेळीप व धनगर (गाकुवेध) फेडरेशनने केला आहे.त्यामुळे सर्वांनी एकजुटीने त्याला विरोध करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.

केंद्र व राज्य सरकार हे आदिवासी समाजाच्या हिताचे नसून ते विरोधी आहे. या समाजाची ओळख ठेवण्यासाठी प्रत्येकाने जात - पात, धर्म व समाज दर्जा, गरीब व श्रीमंत यामधील भेदभाव विसरून एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे गोव्यातील आदिवासी तसेच इतरांनी या कायद्याविरोधात आवाज उठवण्यासाठी एकसंध राहण्याचे आवाहन फेडरेशनचे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी केले आहे.या समाजाची ओळख या नागरिक दुरुस्ती कायद्यामुळे नष्ट होण्याची शक्यात असल्याने या समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून हा समाज त्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत.कूळ मुंडकार कायद्यात दुरुस्तीसाठीची मागणी अजून पूर्ण झालेली नाही.या दुरुस्ती कायद्यामुळे त्याचा अधिक परिणाम होणार आहे.कुळ मुंडकारसंदर्भात या आदिवासींकडे असलेले पुरावे अपुरे असल्याने त्यांना घराचे, जमिनीचे हक्क मिळवण्यासाठी मामलेदारांकडे प्रकरणे प्रलंबित आहेत.राज्यातील ८० टक्के कुळ मुंडकारांकडे व्यवस्थित दस्ताऐवज नाहीत.त्यामुळे अनेकांना त्यांच्या वहिवाटीखालील जमिनींवरील हक्क सोडावा लागला आहे.त्यामुळे आदिवासींचे या नव्या नागरिक दुरुस्ती कायद्यामुळे तसेच एनआरसीमुळे मोठे नुकसान होणार आहे, असेही रुपेश वेळीप म्हणाले.

संबंधित बातम्या