विद्यापीठातील उपहारगृह चालक बदलला

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पणजी:एफडीएची कारवाई अस्वच्छतेबद्दल झाले होते बंद

पणजी:एफडीएची कारवाई अस्वच्छतेबद्दल झाले होते बंद

गोवा विद्यापीठातील उपहारगृहामध्ये (कॅन्टिन) आढळलेल्या अस्वच्छतेनंतर अन्न व प्रशासन खात्याने या उपहारगृहाला टाळे ठोकले होते. ही कारवाई डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. विद्यार्थ्यांचे होणार हाल लक्षात घेऊन विद्यापीठाने उपहारगृह चालक बदलून ते आता वसतिगृह चालकाकडे सुपूर्द केले आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उपहारगृहामधील तेलाविषयी व बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी कुत्र्यांचा वाढलेल्या वावरांविषयी काहींनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती.या तक्रारीची दखल घेत या खात्याने त्या उपहारगृहाला टाळे ठोकले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांची, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यापीठात येणाऱ्या लोकांची गैरसोय होत होती. विद्यापीठ प्रशासनाने थेट उपहारगृह चालक बदलून टाकला आणि गेल्या दोन आठवड्यांपूर्वी त्याचा ताबा वसतिगृह चालकाकडे दिला.अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या अटीनुसार उपहारगृह सुरू करण्यात आले असून, या परिसरात कुत्र्यांचा वावरही आता कमी झाला आहे.पूर्वी थेट कुत्री उपहारगृह घुसत होती, अशा तक्रारी होत्या.
सकाळी आठ वाजल्यापासून उपहारगृह सुरू होऊन ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहते, तोपर्यंत या ठिकाणी सतत विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते.उपहारगृह बंदच्या काळात विद्यार्थ्यांना अनेस संकटांना त्रास सहन करावा लागला होता.

 

 

 

 

सीएए’विरोधात एकजूट व्हावी

संबंधित बातम्या