कृषी उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पणजी:शेती ही काळाची चाचणी घेणारा दीर्घकालीन व्यवसाय आहे.गोव्यातील लोकांनी गहन कृषीपद्धती आणि यांत्रिकीकृत शेती अंगीकारली पाहिजे.शेतकऱ्यांनी शाश्वत विकासात सामील व्हावे, यासाठी माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकाधिक कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथिल ढवळीकर यांनी केले.कुंडई-धारजोवाडा येथे भात लावणी कामास प्रारंभधारजोवाडा-कुंडई येथे भात प्रत्यारोपण यंत्रातर्फे लावणी कामास प्रारंभ केल्यानंतर ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

पणजी:शेती ही काळाची चाचणी घेणारा दीर्घकालीन व्यवसाय आहे.गोव्यातील लोकांनी गहन कृषीपद्धती आणि यांत्रिकीकृत शेती अंगीकारली पाहिजे.शेतकऱ्यांनी शाश्वत विकासात सामील व्हावे, यासाठी माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकाधिक कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथिल ढवळीकर यांनी केले.कुंडई-धारजोवाडा येथे भात लावणी कामास प्रारंभधारजोवाडा-कुंडई येथे भात प्रत्यारोपण यंत्रातर्फे लावणी कामास प्रारंभ केल्यानंतर ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सरपंच रामू नाईक, उपसरपंच मोहन गावडे, पंच सदस्य लक्ष्मण जोशी, शिल्पा कुवेलकर व शेतकरी उपस्थित होते.
मिथिल ढवळीकर म्हणाले की, गोव्यात अलिकडच्या वर्षात भात लागवडीत घट झाली आहे. कारण शेतकरी रोपवाटिका वाढवणे व पुनर्लावणी करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे.गेल्या दहा वर्षांत अधिक श्रम, खर्च आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शेतीची पडझड होत आहे.ही मरगळ दूर करण्यासाठी माधवराव ढवळीकर ट्रस्टकडून गेल्या चार वर्षांपासून येथील शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येते.सरपंच रामू नाईक यांनी सांगितले की, माधवराव ढवळीकर ट्रस्टने गोव्याच्या शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे काम हाती घेतले असून, राज्यात लावणी करणाऱ्या प्रत्यारोपणामुळे कुंडईतील शेतकऱ्यांना काम करणे सोपे झाले आहे. मडकई मतदारसंघाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलेल्या भरिव योगदानामुळे कुंडई येथील शेतकरी शेती व्यवसायात टिकून असल्याचेही ते म्हणाले.
ढवळीकर ट्रस्टचे समन्वयक गोकुळदास गावडे यांनी स्वागत केले.पंच सदस्य लक्ष्मण जोशी यांनी आभार मानले.

 

 

पशुखाद्य दरवाढीच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय

संबंधित बातम्या