‘सुमूल’च्या संकलन केंद्रात दूध फॅट मापताना तफावत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

डिचोलीः ‘सुमूल’ डेअरीच्या डिचोली येथील संकलन केंद्रात दूध फॅटचे करण्यात येत असलेले मापन संशयास्पद असून, अधूनमधून दूधातील फॅटचे प्रमाण कमी दाखवण्यात येत आहे. असा दावा या संकलन केंद्रात दूध पुरविणाऱ्या काही उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे आम्हाला दुधाच्या दरात कपात सहन करावी लागत असून, आर्थिक फटका बसत आहे, अशी या दूध उत्पादक शेतकऱ्यांची तक्रार आहे. आठवड्यापूर्वी काही दिवस या गोष्टीचा प्रत्यय आल्याची माहितीही या शेतकऱ्यांनी दिली.

यासंबंधी श्री वडेश्वर संस्था संचलित ‘सुमूल’च्या दूध संकलन केंद्राला भेट दिली असता, संस्थेचे अध्यक्ष श्री. पळ आणि कर्मचाऱ्यांनी दूध उत्पादकांचा दावा फेटाळला. थंड हवामान आणि फॅट मापन यंत्रात तांत्रिक दोष निर्माण झाला, तरच फॅट मापनावर परिणाम होण्याची शक्यता असते, असे त्यांनी स्पष्ट केले. यंत्रात दोष निर्माण झाला तर, तंत्रज्ञाना पाचारण करून हा दोष दूर करावा लागतो, अशी माहितीही देण्यात आली.

‘सुमूल’च्या डिचोली येथील दूध संकलन केंद्रात जवळपास ४५ शेतकरी दुधाचा पुरवठा करतात. मात्र, अधूनमधून या केंद्रात दुधाच्या फॅटचे मापन करताना तफावत दिसून येत आहे. फॅट कमी असल्याची नोंद करण्यात येते. हेच दूध अन्य संकलन केंद्रात नेवून मापन केले, तर फॅट वाढीव असल्याचे आढळून येते. यावरून या संकलन केंद्रातील फॅट मापन करताना अन्याय करण्यात येत आहे, अशी दूध उत्पादकांची तक्रार आहे.

संबंधित बातम्या