बेळगावातील वाहनांना मोलेत अटकाव

Dainik Gomantak
गुरुवार, 23 एप्रिल 2020

बेळगावातील वाहनांना मोलेत अटकाव 

धारबांदोडा, 

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बेळगावहून मोले मार्गे गोव्यात येणाऱ्या वाहनांना अटकाव करावा, अशी मागणी सावर्डे गट कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यासंबंधीचे एक निवेदनही धारबांदोडा उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
सावर्डे मतदारसंघातील गट कॉंग्रेसचे अध्यक्ष गौतम ऊर्फ शाम भंडारी, युवा अध्यक्ष संकेत भंडारी तसेच सोमनाथ व सर्वेश नाईक आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.
मोले चेकनाक्‍यावर बेळगावहून येणाऱ्या भाजीपाला व इतर साहित्याच्या वाहनाची कसून तपासणी होत नसल्याने हा धोका वाढल्याचे मत धारबांदोड्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
गोव्यात येण्यासाठी कर्नाटकातील लोकांकडून रेल्वे मार्ग तसेच वन खात्याच्या हद्दीचा वापर करण्यात येत असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, मोले चेकनाक्‍यावर मोले पंचायत मंडळाने भेट देऊन खबरदारीसंबंधीची माहिती जाणून घेतली. यावेळी सरपंच स्नेहलता नाईक, उपसरपंच सुशांत भगत, पंच रामकृष्ण गावकर, समर कदम व इतर पंच उपस्थित होते.

संबंधित बातम्या