विजयामुळे गोव्याला दिलासा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पणजी: जम्मू-काश्मीरची सहाव्या विकेटची जोडी मुसैफ एजाझ (११५) व लोन नासीर मुझफ्फर (९०) गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत होती तेव्हा पाहुण्या संघाचे पारडे जड होते व यजमान संघ दबावाखाली होता, पण नसीर याला डावखुरा फिरकीपटू बलप्रीतसिंग छड्डा याने त्रिफळाचीत बाद केल्यानंतर गोव्याच्या कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

पणजी: जम्मू-काश्मीरची सहाव्या विकेटची जोडी मुसैफ एजाझ (११५) व लोन नासीर मुझफ्फर (९०) गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत होती तेव्हा पाहुण्या संघाचे पारडे जड होते व यजमान संघ दबावाखाली होता, पण नसीर याला डावखुरा फिरकीपटू बलप्रीतसिंग छड्डा याने त्रिफळाचीत बाद केल्यानंतर गोव्याच्या कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

सांगे येथील जीसीए मैदानावर झालेल्या चार दिवसीय सामन्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी गोव्याने जम्मू-काश्मीरला ७१ धावांनी नमवून विजयाच्या ६ गुणांची कमाई केली. गोव्याचे आता ६ लढतीतून ११ गुण झाले असून पदावनती टाळण्याच्या शर्यतीत स्वप्नील अस्नोडकर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला मोठा दिलासा लाभला आहे. गोवा आता सहाव्या क्रमांकावर आला. हरियानाचेही ७ लढतीतून गोव्याइतकेच ११ गुण झाले असून त्यांची धावसरासरी सरस असल्यामुले ते पाचव्या स्थानी आहेत. जम्मू-काश्मीरला पहिलाच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे ६ लढतीनंतर १४ गुण आणि चौथे स्थान कायम राहिले आहे. गोव्याचा पुढील सामना ६ फेब्रुवारीपासून उत्तराखंडविरुद्ध डेहराडून येथे खेळला जाईल.

कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात २५ धावांची आघाडी संपादली होती. दुसऱ्या डावात त्यांच्यासमोर विजयासाठी दुसऱ्या डावात ३३३ धावांचे आव्हान होते. त्यांचा डाव २६१ धावांत संपुष्टात आला. काल तिसऱ्या दिवसअखेर त्यांची १ बाद ४१ अशी स्थिती होती. आज सकाळच्या सरात्रात मध्यमगती निहाल सुर्लकर व दीपराज गावकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत जम्मू-काश्मीरची स्थिती ५ बाद ५२ अशी नाजूक केली. त्यानंतर मुसैफ व नासीर यांनी गोव्यावर प्रतिहल्ला चढवत सहाव्या विकेटसाठी १८४ धावांची आक्रमक भागीदारी केली. डावात ४ गडी बाद केलेल्या बलप्रीतने नासीरला बाद करून गोव्याच्या मार्गावरील मोठा अडसर दूर केला. नासीरचे शतक १० धावांनी हुकले. त्याने ११२ चेंडूंतील खेळीत १० चौकार व ३ षटकार मारले.

नासीर बाद झाल्यानंतर जम्मू-काश्मीरने २५ धावांत ५ विकेट्स गमावल्यामुळे गोव्याला विजयाचा जल्लोष करता आला. शतकवीर मुसैफ नवव्या विकेटच्या रुपात बाद झाला. त्याला गोव्याचा कर्णधार दीपराज गावकर याने धावचीत केले, त्यानंतर जम्मू-काश्मीरला गुंडाळणे गोव्याला कठीण गेले नाही. मुसैफने १४५ चेंडूंत ११५ धावा करताना १४ चौकार व १ षटकार मारला. उपाहाराला ५ बाद १९० धावा केलेल्या जम्मू-काश्मीरला दिवसातील दुसऱ्या सत्रात गोव्याच्या फिरकी गोलंदाजांनी सतावले.

संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव : २०८ व दुसरा डाव : ३५७ वि. वि. जम्मू-काश्मीर, पहिला डाव : २३३ व दुसरा डाव (१ बाद ४१ वरून) : ६२ षटकांत सर्व बाद २६१ (अभिशांत बक्षी २७, मुसैफ एजाझ ११५, लोन नासीर मुझफ्फर ९०, निहाल सुर्लकर १५-१-६१-२, दीपराज गावकर ८-३-३०-२, बलप्रीतसिंग छड्डा १६-०-६२-४, विश्वंबर काहलोन १०-१-६२-०, धीरज यादव १३-१-४२-१).
क्रिकेट 

संबंधित बातम्या