Viral: गोव्यातील विजमंत्र्यांचा ‘गरबा डान्स’

कुडचडेचे आमदार आणि वीजमंत्री नीलेश काब्राल यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरला झाला आहे
Viral: गोव्यातील विजमंत्र्यांचा ‘गरबा डान्स’
Goa Power Minister Nilesh CabralDainik Gomantak

राज्यात (Goa) सध्या राजकीय (Politics) घडामोडींना उत आलाय. अनेक नेते एकमेकांच्या भेटी गाठी घेण्यात व्यस्त आहेत. मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे मनधरनी करणेही सुरु आहे तर मागेल ते मिळणार नसल्याचे पाहून काहींना राग आला ही त्यामुळे त्यांनी अबोलाही धरला आहे. भाजपचे नेते आपल्या आपल्या मतदार संघात मतदारांच्या गाठी भेट घेउन त्यांची जवळीक जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चतुर्थीनंतर आता नवरात्रोत्सव उत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने नेत्यांना देवीची आठवण होणे साहजिकच. कुडचडेचे आमदार आणि वीजमंत्री नीलेश काब्राल (Goa Power Minister Nilesh Cabral) यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरला झाला आहे. या व्हिडिओत ते महिलांसोबत गरबा नृत्य करताना दिसत आहेत. आश्चर्य म्हणजे, काकोडा येथे वीज गुल झाल्यानंतर एका लाइनमनकडून टीप्स घेत नृत्य करताना वीजमंत्र्यांना पाहून अनेकांना धक्का बसला. यापूर्वी, माविन गुदिन्हो यांचाही ‘गरबा’ असाच व्हायरला झाला होता. ∙∙∙

Related Stories

No stories found.