सोकोर्ड्यात गावठी बॉम्बच्या स्फोटात गायीचा नाहक बळी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

बॉम्बच्या स्फोटात गायीच्या तोंडाचा जबडा पूर्णपणे निकामी झाल्याने गाय रक्तबंबाळ होऊन साकोर्डा पंचायत कार्यालयाच्या शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत थांबली होती.

तांबडीसुर्ला : साकोर्डा परिसरात रानटी जनावरांची बिनधास्तपणे शिकार करण्यासाठी काही अज्ञात लोकांनी गावठी बनावटीचे बॉम्ब पेरून ठेवले होते. जनावरांना बॉम्ब खाण्याची चटक लावण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे द्रव्य तेल लावून ठेवतात.

त्यामुळे जंगली जनावरे बॉम्ब खाण्यासाठी त्या दिशेने वळतात. खासकरून डुक्करांची शिकार करण्यासाठी पेरून ठेवलेले बॉम्ब गायीने फस्त केल्याने झालेल्या स्फोटात तिचा दुर्दैवी बळी गेल्याची वेदनादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील गोप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
तीव्र वेदनांनी ती व्याकुळ झाली होती. स्फोटात जबडा निकामी होऊन खाली लोंबकळत असलेले दृश्य पाहून गोप्रेमींना हादरा बसला.

गायीच्या तोंडाची झालेली दयनीय अवस्था बघून संजय व शालन नाईक या दांपत्यांना धक्का बसल्याने ते अस्वस्थ झाले. गायीची झालेली अवस्था पाहून जीवाचा थरकाप उडत होता. बॉम्बच्या स्फोटात गायीच्या जबाड्याचा चेंदामेंदा झाल्याने तिच्यावर कोणतेच उपचार करणे शक्य नव्हते, असे येथील पशुपालन केंद्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गायीवर कोणताही उपचार करणे शक्य नसल्याने अखेर तिला मृत्यूने कवटाले.

 

मंजुरीविनाच पाचव्या वेतन आयोगानुसार ‘ओव्हरटाईम

संबंधित बातम्या