आम्ही  भोगले, आणखी कुणाच्या  वाट्याला नको

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

काणकोण : खोतिगाव - नडके - केरी येथे मूलभूत सुविधा नसल्याेने ग्रामस्थांतनी व्याथा मांडल्या‍. यावेळी केरी येथील रेश्मा गावकर यांनी आपल्या मुलीने वाड्यावर जाण्यास रस्ता नाही, वीज नाही अशा परिस्थितीत दुसऱ्यांकडे राहून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ही परिस्थिती अन्य मुलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी येथील सत्यवती गावकर, चंद्रावती वेळीप, कृष्णा गावकर यांनीही त्यांना समर्थन दिले.

खोतिगावातील नडके - केरी गावातील रहिवासी अद्याप रस्त्याच्या सोयीपासून वंचित असल्याने येथील ५० मुले खोतिगावात माध्यमिक शाळा असूनही सगेसोयरे, वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. त्याचा परिणाम सरकारी माध्यमिक शाळेच्या पटसंख्येवर झाल्यारचे पंच व पालक - शिक्षक संघाचे अध्यक्ष पाईक वेळीप यांनी सांगितले.

पेडण्यात कसिनो नकोच, प्रयत्न हाणून पाडू

पैंगीण पंचायत क्षेत्रातील मार्ली-तिर्वाळ गावांना ज्या धर्तीवर रस्ता व अन्य सुविधा निर्माण करण्यास वनखात्याने अनुमती दिली. तोच न्याय वापरून नडके-केरी गावाला वापरण्याची मागणी नडकेचे माजी पंच आनंद गावकर यांनी केली आहे. गेली अनेक वर्षे येथील जमिनीचे मालक दरवर्षी जमीन कर सरकार दरबारी जमा करीत आहेत. त्याचे चलनही येथील रहिवाशांकडे आहे. दरवर्षी जानू पुर्सो गावकर यांच्या नावे जमीन कर भरण्यात आला आहे. सरकारने येथील रहिवाशांना विश्वासात न घेता ते कसत असलेल्या जमिनीचा समावेश खोतीगाव अभयारण्यात केला, असे त्याचे म्हणणे आहे.

महसुलासाठी पर्याय शोधावा लागेल

येडा येथे वनखात्याचे फाटक
येडा व केरी वाड्याकडे जाणाऱ्या साडेतीन मीटर लांबीच्या मातीच्या रस्त्यावर वन खात्याने वीस वर्षांपूर्वी फाटक (गेट) लावले आहे. पूर्वी या गेटची एक चावी स्थानिक पंच आनंद गावकर यांच्याकडे वनखात्याने ठेवली होती. मात्र, आता चावी वनखात्याकडेच असल्याने गावात कोणी आजारी असल्यास वन कर्मचाऱ्यांना शोधावे लागत आहे. पावसाळ्यात हा मातीचा रस्ता चिखलमय होतो. त्याचप्रमाणे या रस्त्यावर दोन ओहळ असून पावसाळ्यात ते दूधडी भरून वाहतात त्यावेळी शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून ओहोळ पार करावे लागतात. मुख्यवनपाल, अनुसूचित जमाती महामंडळाचे आयुक्त, मुख्यमंत्री याच्याकडे मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी दयेचे अर्ज करण्यात आले. मात्र, आजपर्यंत कोणीच दखल घेतली नसल्याचे आनंद गावकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या