नगरसेवक बांदेकर, पालकर अडचणीत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

मुरगाव: नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांचे समर्थन करताना १४४ कलमांचा भंग करून मुरगाव पोलिस स्थानक परिसरात जनतेला धमकी देणारे वक्तव्य करणाऱ्या मुरारी बांदेकर, सारीका पालकर या ननगरसेवकांवर तसेच संजय परब आणि इतरांवर कारवाई करावी असा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून दिला आहे.

हेडलॅन्ड सडा येथील आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.जेटी बोगदा येथे मंत्री मिलिंद नाईक यांच्या समर्थकांनी २२ डिसेंबर २०१९ या दिवशी जाहीर सभा घेतली होती.त्या सभेत नगरसेवक मुरारी बांदेकर, सारीका पालकर यांनी तसेच संजय परब आणि इतरांनी विरोधकांवर हल्लाबोल करताना पत्रकारांवरही निशाणा साधला होता.आरटीआय कार्यकर्ते, समाजसेवक, पत्रकार यांच्या घरात घुसून त्यांना मारण्याची धमकी दिली होती.जेव्हा ही जाहीर सभा घेण्यात आली होती तेव्हा १४४ कलम जारी झाले होते, तरीही या कलमांचा भंग करून जाहीर सभा घेऊन धमकी देणारे भाषण सभेत करण्यात आले होते.

हेडलॅन्ड सडा येथील जागृत नागरिक तथा आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवाकर यांनी या जाहीर सभेतील वक्त्यांच्या धमकी देणाऱ्या भाषणांची दखल घेऊन मुरगाव पोलिस आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली.मुरगाव पोलिसांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केले परंतु दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून दखल घेऊन १४४ कलम जारी केलेले असताना जाहीर सभा घेऊन प्रक्षोभग भाषणे देणाऱ्या मुरारी बांदेकर, सारीका पालकर, संजय परब आणि इतरांवर कारवाई करण्याचे आदेश दक्षिण गोवा पोलिस अधिक्षकांना दिले आहे.

नवेवाडे येथे कुत्र्याला विष घालून मारण्याचा प्रकार

संबंधित बातम्या