कोविड १९ नियमांचे उल्लंघन

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

 केल्याची मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार

पणजी

राज्यात टाळेबंदी असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड - १९ च्या नियमांचे उल्लंघन केले यासंदर्भात नव्याने पर्वरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पूर्वी दिलेल्या तक्रारीत पोलिसांनी अजूनही कारवाई केली नाही. त्यामुळे वेळ आल्यास यासंदर्भात न्यायालयातही जाणार असल्याची माहिती संजय बर्डे यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रिमंडळ बैठक घेताना किंवा सरकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना तोंडाला मास्क लावत नव्हते तसेच ते सामाजिक अंतरही ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांनी कोविड - १९ च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी पणजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र ठिकाणाच्या अधिकारक्षेत्रानुसार ही तक्रार पर्वरी पोलिस ठाण्यात देणे आवश्‍यक होते. त्यामुळे पणजी पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेऊन नव्याने पर्वरी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
जे लोकप्रतिनिधी कायदे करत करतात तेच स्वतः कायद्याची अंमलबजावणी करत नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही व तो सर्वांनाच समान असतो. त्यामुळे कोविड - १९ या नियमांनुसार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी उल्लंघन केल्याचे मान्य करून लोकांची माफी मागायला हवी. जर त्यांनी ती मागितली नाही तर पोलिसांनी यासंदर्भात गंभीर दखल घेण्याची गरज आहे. या तक्रारीसंदर्भात पोलिसांकडून अजूनही कोणतीच चौकशी सुरू झालेली नाही. या प्रकरणाचा मी पुरेपूर पाठपुरावा करणार आहे. पोलिसांनी येत्या काही दिवसांत कारवाई न केल्यास त्याविरोधात न्यायालयात जण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बर्डे म्हणाले.

संबंधित बातम्या