कॉपीराईट कायद्याचा भंग, चौघांना अटक, सुटका

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

सासष्टी : कॉपीराईट (स्वामीत्व हक्क) कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून गुरुवारी रात्री मडगाव पोलिसांनी मोबाईल दुकानदार जब्राराम पुरोहित (३६, आके), बाबूलाल राजपुरोहित (२८, कोंबा), सय्यद अमजेद (४५, आके) व महादेव देवासी (३०, गांधी मार्केट) यांना अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या मोबाईल दुकानदारांनी ॲपल कंपनीची उपकरणे विक्री केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव परिसरात असलेल्या तीन मोबाईल दुकानात ॲपल कंपनीची उपकरणे प्रदर्शित करून विक्री करीत असल्याप्रकरणी ग्रीफिन इंटलेक्चुअल प्रॉपर्री सर्विसचे अधिकारी यशवंत मोहिते यांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यानुसार मडगाव पोलिसांनी त्वरित कारवाई जब्राराम पुरोहित, बाबूलाल राजपुरोहित, सय्यद अमजेद व महादेव देवासी यांना अटक केली.

मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. जब्राराम हा किंग एलसीडी मोबाईल शॉपचा मालक आहे. बाबूलाल हा रामदेव मोबाईल शॉपचा मालक आहे तर महादेव देवासी हा महादेव मोबाईल शॉपचा मालक आहे. पोलिसांनी संशयिताविरुध्द कॉपीसाईट कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. 

संबंधित बातम्या