व्‍हायरॉलॉजी लॅब २४ तास कार्यरत

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

योग्य तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित डॉक्टर असणाऱ्या या व्हायरॉलॉजी लॅबला इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च प्रयोगशाळेची मंजुरी आहे. राज्यातील संशयित लोकांच्या कोरोना पडताळणी चाचण्या जलद आणि अधिकाधिक करण्याच्‍या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

पणजी :

राज्यात अधिकाधिक कोरोना पडताळणी चाचण्या करून घेण्याच्या दृष्टीने राज्यात कार्यरत असलेली व्हायरॉलॉजी लॅब आता २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. तसेच राज्याचे आरोग्य मंत्रालय पीसीआर यंत्रणा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. जेथे शरीरावर कोरोनाचा प्रभाव आहे की नाही, याची चाचणी घेता येतील.

योग्य तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित डॉक्टर असणाऱ्या या व्हायरॉलॉजी लॅबला इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च प्रयोगशाळेची मंजुरी आहे. राज्यातील संशयित लोकांच्या कोरोना पडताळणी चाचण्या जलद आणि अधिकाधिक करण्याच्‍या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात जुने गोवे रेसिडेंन्‍सी येथे ४, मडगाव रेसिडेंन्‍सी येथे १६, मये येथील रुग्णालयात १२ आणि म्हापसा येथे २२ संशयित आहेत.

थर्मल गनचे लवकरच वितरण
रविवारी एकूण ११ लोकांना सुविधाकृत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष कक्षात आज ३ जणांना ठेवण्यात आले, तर येथे एकूण ४ संशयित आहेत. एकूण ५२ लोकांचे नमुने कोरोना पडताळणी चाचणीसाठी पाठवले असून ९९ जणांच्या आरोग्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्‍यान, राज्यात एक हजार थर्मल गन आल्या आहेत. या थर्मल गन सरकारी कार्यालयातून आलेल्या मागणीनुसार देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

संबंधित बातम्या