मडगाव कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक मार्ग प्रकरण

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

मिरवणुकीचा मार्ग आज ठरणार
गोवा खंडपीठात होणार सुनावणी, कार्निव्हल समितीला नोटीस

पणजी : मडगाव कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक जुन्या पारंपरिक मार्गाने काढण्याचा निर्णय कार्निव्हल समितीने घेतला आहे. मात्र, अजूनही त्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिसांकडून रितसर परवाना घेतलेला नाही. राष्ट्रीय महामार्गाकडून मडगाव शहरातून जाणाऱ्या या मिरवणुकीला परवाना दिल्यास तो कोणत्या आधारावर दिला त्याचे स्पष्टीकरण करावे. जनहित याचिकेत मडगाव कार्निव्हल समितीला प्रतिवादी करून नोटिशीला उत्तर देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निर्देश देऊन त्यावरील सुनावणी उद्या २१ फेब्रुवारीला ठेवली आहे.

मडगाव कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग २०१६ मध्ये बदलून तो फातोर्डा भागातून राष्ट्रीय महामार्गाने करण्यात आला होता. गेल्या वर्षापर्यंत हा मार्ग मिरवणुकीसाठी अवलंबिण्यात येत होता. यावर्षी या मार्गात बदल करून पूर्वीचा जुन्याच पारंपरिक मार्गाने ही चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्णय समितीने घेतला. राष्ट्रीय महामार्गाकडून ही मिरवणूक व्हाया मडगाव होली स्पिरिट चर्च, हॉस्पिसिओ इस्पितळ व मडगाव शहरातून त्यामुळे जाणार आहे. या मडगाव शहरातून जाणाऱ्या मिरवणुकीमुळे रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते. इस्पितळातील रुग्णांना या मिरवणुकीतील ध्नवी प्रदूषणाला सामोरे जावे लागते.

त्यामुळे कार्निव्हल मिरवणुकीसाठी पूर्वीचाच मार्ग कायम ठेवण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती जनहित याचिकेत करण्यात आली आहे. गेल्या सोमवारी ही जनहित याचिका प्राथमिक सुनावणीस आली असता खंडपीठाने ती दाखल करून घेतली होती व प्रतिवाद्यांना नोटीस बजावून उत्तर देण्यास सांगून ही सुनावणी आज ठेवण्यात आली होती.

ही जनहित याचिका आज गोवा खंडपीठासमोर सुनावणीस आली तेव्हा सरकारी वकिलांनी या कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीला आवश्‍यक असलेले परवाने मिळाल्याचे सांगितले मात्र खंडपीठाने त्याची शहानिशा करण्यास बजावले असता त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता परवान्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून हे परवाने अजून मिळायचे आहेत. उद्यापर्यंत या परवान्याची प्रत खंडपीठासमोर ठेवली जाईल अशी बाजू मांडली. गोवा खंडपीठानेही अशा माहितीबाबत संताप व्यक्त केला.

 

यांना मिळाला कचरा प्रकल्पाचा ताबा

 

संबंधित बातम्या