पत्रादेवी ते विर्नोडा महामार्गाचे काम बंद ठेवा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

धारगळ:पत्रादेवी ते विरनोडा जंक्शन पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग १७  

धारगळ:पत्रादेवी ते विरनोडा जंक्शन पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग १७  

उपमुख्यमंत्री : वारखंड उड्डाणपुल होईपर्यंत काम बंद ठेवण्याची सूचना
जो पर्यंत विर्नाडा जंक्शन आणि वारखंड नाक्यावर उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करावे, अशी सूचना महामार्गाचे कंत्राटदार श्रीनिवास राव यांना आदेश उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केली आहे.
पत्रादेवी ते विर्नोडा जंक्शनपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग १७ चे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.अनेक गावातून या महामार्गाला विरोध होत आहेत, याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी या रस्त्याचे कंत्राट श्रीनिवास राव सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर तसेच सहाय्यक अभियंता नारायण मयेकर, फिलिप रोझ तसेच श्री. कामत त्यांचा सोबत अनेक पंचायतीचे सरपंच, पंच व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या कित्येक महिन्यापासून या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले.येथे अतापर्यंत विविध अपघातांमध्ये ११ जण मरण पावले आहेत.त्यामुळे अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग अडवले गेले.एक दिवसीय उपोषण अशी अनेक आंदोलने या रस्त्यावर झाली.याची दखल घेऊन या भागाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी मंत्री पाऊसकर आणि अभियंत्याना पाचारण केले होते.वारखंड नाक्यावर उड्डाणपूल बांधण्याची मागणी स्थानिक पंच, सरपंच व ग्रामस्थांनी लावून धरल्याने जोपर्यंत उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत येथील काम बंद ठेवावे, अशी मागणी केली.कारण वारखंड नाक्यावरून मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी बायपास रस्ता आहे.त्यमुळे या रस्त्यावरून पुढील वर्ष-दीड वर्षात मोठ्या प्रमाणात गाड्यांची रहदारी वाढणार आहे.या सर्वांचा विचार करून येथे उड्डाणपूल होणे गरजेचे आहे, असे मतही मंत्री बाबू आजगावकर यांनी मांडले आणि जोपर्यंत उड्डाणपूल होत नाही, तोपर्यंत येथील काम बंद ठेवावे, अशी सूचनाही कंत्राटदाराला दिली.
विर्नोडा जंक्शन साठी विर्नोडा गाव एकत्र जमला होता. काम न झाल्यास आंदोलनही करण्यास रस्त्यावर उतरणार असल्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली होती.गेल्या तीन दिवसाअगोदर ज्ञानेश्वर नाईक यांचा गाडी खाली पडून मृत्यू झाला.याला जबाबदारसुद्धा कंत्राटदार असल्याचे लोकांनी सांगितले.त्या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा किंवा उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी धरली.मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांनी उड्डाणपूल होणे शक्य नाही असे सांगितले.त्यामुळे ग्रामस्थाने मंत्री आजगावकर आणि अभियंते उत्तम पार्सेकर यांच्याशी हुज्जत घालण्याचा सुरू केले.शेवटी उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत रस्ता करू नये, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले .

जिल्हा पंचायतीच्या निम्म्या जागा लढवणार

संबंधित बातम्या