वॉरन बफे यांनी एवढे शेअर विकत घेतले.

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

वॉरन बफेंकडून "बर्कशायर हॅथवे'चे
2.2 अब्ज डॉलरचे "शेअर बायबॅक'

एकाच तिमाहीत "शेअर बायबॅक'साठी मोठी रक्कम खर्च करण्यात आली आहे. शिवाय आणखी "शेअर बायबॅक'च्या प्रयत्नात वॉरन बफे आहेत. दोन वर्षांपूर्वी बर्कशायर हॅथवेच्या "शेअर बायबॅक'च्या धोरणात गोंधळ उडाला होता. मात्र, त्यानंतर कंपनीने सावधगिरीने पावले उचलत 6.3 अब्ज डॉलरचेच "शेअर बायबॅक' केले आहेत. बफे दर महिन्याला समभाग विकत घेणे सुरूच ठेवणार आहेत.

वॉशिंग्टन : प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी 2019च्या अखेरच्या तिमाहीत मोठ्या प्रमाणावर "शेअर बायबॅक' केले आहे. त्यांनी सुमारे 2.2 अब्ज डॉलर मूल्याचे बर्कशायर हॅथवेचे समभाग खरेदी केले आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात "शेअर बायबॅक' करूनही बर्कशायर हॅथवेकडे 2019 अखेर एकूण 128 अब्ज डॉलरची रोख शिल्लक आहे. बफे हे बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

बफे यांचे भागीदार आणि मुख्य गुंतवणूकदार असलेले 96 वर्षांचे चार्ली मंगर निवृत्त झाल्यानंतरही कंपनीचे भवितव्य उत्तम असल्याचा दिलासा बफे यांनी समभागधारकांना दिला आहे.

बफे यांच्यानंतर अजित जैन किंवा ग्रेग एबेल हे बर्कशायर हॅथवेची सूत्रे हाती घेण्याची शक्‍यता आहे. चौथ्या तिमाहीत बर्कशायर हॅथवेचे उत्पन्न घटून 4.42 अब्ज डॉलरवर आले होते. मागील वर्षी याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या उत्पन्नात 23 टक्‍क्‍यांची घट झाली होती.
 

संबंधित बातम्या