या पदपूलाच्या दुरुस्तीसाठी जलस्त्रोत खात्याकडे नागरिकांची मागणी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

कुर्टीतील लोखंडी पदपुलाची दूरवस्‍था

जलस्रोत खात्याने दुरुस्‍ती करण्‍याची नागरिकांची मागणी

लोखंडी पदपूल असा धोकादायक स्थितीत आहे.

फोंडा : गृहनिर्माण वसाहत कुर्टी ते मेस्तवाडा फोंडा दरम्यान वाहत्या नाल्यावर उभारण्यात आलेल्या लोखंडी पदपुलाची दूरवस्था झाली आहे. जलस्रोत खात्याने या लोखंडी पदपुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गेल्या पावसाळ्यात या लोखंडी पदपुलाचे पुराच्या वाहत्या पाण्याने दोन्ही बाजूचे कठडे कोसळले होते. मात्र अजूनपर्यंत ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या पदपुलावरून ये जा करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

पूर्वी येथे कच्चा पदपूल होता. त्यानंतर आमदार रवी नाईक यांच्या प्रयत्नाने मजबूत असा लोखंडी पदपूल जलस्रोत खात्यामार्फत उभारण्यात आला होता. पदपुलावरून जाणाऱ्या सळ्या गंजलेल्या अवस्थेत असून पुलावरील लोखंडी पृष्ठभाग कमकुवत झाला आहे. या लोखंडी पदपुलाचा अधिकाधिक लोक वापर करत आहेत. विशेषतः शालेय मुले या पुलावरून अधिक ये जा करीत आहेत.

लोखंडी पुलाच्या कोसळलेल्या सळ्यांमुळे शालेय मुलांना व पादचाऱ्यांना धोका उद्‌भवू शकतो. लोखंडी पदपुलांच्या जुन्या पत्र्याच्या जागी नवीन पत्रे घालणे आवश्‍यक आहे. पदपुलावरील पत्रे जीर्ण अवस्थेत असून त्यामुळे शालेय मुलांना अधिक धोका आहे. या लोखंडी पदपुलाची अलीकडेच रवी नाईक यांनी पाहणी केली असून जलस्त्रोत खात्याने कठडे कोसळलेल्या लोखंडी पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
 

 

हे पाहा : खोर्ली येथे आज वीजपुरवठा खंडित

संबंधित बातम्या