विद्याप्रसारक हायस्कूलला पाण्याची सुविधा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

उद्‍घाटनप्रसंगी प्रदूषण महामंडळ चेअरमन गणेश शेटगावकर, सरपंच वैशाली शेटगावकर, मुख्याध्‍यापक दिलीप मेथर व इतर मान्‍यवर. (निवृत्ती शिरोडकर)

मोरजी : विद्याप्रसारक हायस्कूल मोरजी येथे नेस्ले कंपनीकडून स्वछ पिण्याच्या पाण्याच्‍या सुविधेचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष गणेश शेटगावकर उपस्थित होते.

त्याचबरोबर नेस्ले कंपनीचे व्यवस्थापक जगदीप सिंग मरहार, कॉर्पोरेट अफेअर मॅनेजर संजय भंडारी, कॉर्पोरेट अफेअर ऑफिसर पृथ्वी वेलिंगकर उपस्थित होते.त्याचबरोबर मोरजी गावच्या सरपंच वैशाली शेटगावकर, शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्राम शेटगावकर, व्यवस्थापक प्रसन्नकुमार शेटगावकर, सचिव प्रकाश शेटगावकर, खजिनदार संतोष शेटगावकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय सावंत व शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मेथर उपस्थित होते.

पाहुण्यांच्या हस्ते स्वच्छ पाणी प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणाले की, शाळेतील प्रत्येक मुलाने जबाबदारीने वागले पाहिजे.शाळा आणि शाळेतील प्रत्येक वस्तू आपली असून त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.कंपनीचे मॅनेजर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रकल्पासंबंधी महत्त्वपूर्ण अशा सूचना दिल्या आणि मुलांना याची काळजी घेण्यास सांगितले.
यावेळी नेस्ले कंपनीतर्फे प्रत्येक वर्गातून एक प्रमुख निवडण्यात आला. ज्याने या प्रकल्पाची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली. कंपनीतर्फे गायन पथकाला आणि शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

सूत्रसंचालन शिक्षिका मंजिरी शेटगावकर यांनी केले. मुख्याध्यापक दिलीप मेथर यांनी ही सुविधा आपल्या शाळेला दिल्याबद्दल नेस्ले कंपनीचे आणि इतर मान्यवरांचे आभार मानले.

 

संबंधित बातम्या