जलप्रवास करण्यासाठी जेटींच्या बांधकामास प्रयत्नशील : लोबो

lobo .
lobo .

म्हापसा:व्यातील जनतेला भविष्यात जलप्रवास करण्यासाठी सर्व जेटींचे बांधकाम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील : लोबो
गोव्यातील उत्तर व दक्षिण या दोन्ही जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरुन जलप्रवास करण्याच्या दृष्टीने सरकारने सर्व जेटींचे पूनर्बांधकाम करण्यासाठी बंदर खाते प्रयत्नशील आहे.गोवा सरकार वॉटर लॉजिस्टीक हब तयार करणार असल्याचा आशावाद बंदर खाते व विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी म्हापसा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय ध्वज फडकविल्यानंतर जनतेला संबोधन करताना व्यक्त केला.
मंत्री लोबो म्हणाले, जलप्रवास ही काळाची गरज आहे.त्यदृष्टीने राज्य सरकार गोमंतकीय जनतेला भविष्यात जलप्रवास सुखमय करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहेत.उत्तर गोव्यातील कौठंबी जेटी ते शापोरा जेटी तसेच दक्षिण गोव्यातील काणकोण ते साळ नदीपर्यंत जेटींचे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे.या सर्व नद्यावरील जेटींचे एकत्रिकरण करून मांडवी नदीमध्ये जोडणी केली जाईल.या प्रकल्पामुळे गोव्यातील जनतेला या भागातून त्या भागात जायला सोईस्कर पडणार आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचे काम केले आहे.राज्य सरकारने पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी राज्यातील निसर्गरम्य खेड्यांचे दर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे लोबो यांनी सांगितले.
ग्रामीण विकास योजनेअंतर्गत मेरशी येथे गोवा बाजार हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.ही जागा १४ वर्षापूर्वी भू संपादित केली होती.ही जागा विकसित झाल्यानंतर राज्यातील स्वयंसहाय्य गटांना कायमचे विक्री केंद्र म्हणून त्याचा वापर करता येईल.या प्रकल्पामुळे राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी त्याचा निश्‍चित फायदा होईल.
२०२० पर्यंत गोवा राज्य कचरा मुक्त करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत.उत्तर गोव्याच्या कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या धर्तीवर दक्षिण गोव्यात कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहे.जनतेने सरकारचे उद्दिष्ठ सफल करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.अशा प्रकल्पांना विरोध करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणी करू नये.
मंत्री मायकल लोबो यांनी ध्वजारोहण केल्यानंतर पोलिस, एनसीसी व इतर विद्यार्थ्यांकडून मानवंदना स्वीकारली.या प्रजासत्ताकदिन सोहळ्यात म्हापशाचे आमदार जोसुआ डिसोझा, थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर, नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर, अतिरिक्त जिल्हा अधिकारी महादेव आरोंदेकर, उपजिल्हाधिकारी अक्षय पोटेकर व उपजिल्हाधिकारी मामू हॅग, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com