‘मतभेद कधीच मिटले, आम्‍ही एकसंध’ : दिलीप परुळेकर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजी: मागील विधानसभा निवडणुकीवेळी मंत्री मायकल लोबो यांच्यासोबत झालेले मतभेद आता शिल्लक राहिलेले नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्ही सोबत काम करीत आहोत, असे माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

ते म्हणाले, निवडणुकीवेळी निर्माण झालेले मतभेद कायमचे नसतात. ते नंतर मिटतात. मी गेली २६ वर्षे पक्षाचे काम करत आहे. मतदान केंद्रावर सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मंत्री असा प्रवास भाजपच्या पाठींब्यामुळेच शक्‍य झाला आहे. कोणत्याही क्षणी पक्षाने अन्याय केला, अशी भावना माझ्या मनाला शिवलेली नाही. माजी आमदार किरण कांदोळकर यांनी एकेठिकाणी विशिष्ट समाजाच्या नेत्यांवर भाजपकडून अन्याय होतो, त्यात माझे नाव घेतले आहे. माझे त्यांना सांगणे आहे, की राजकारणासाठी त्यांनी माझ्या नावाचा वापर करू नये. ते कोलवाळमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराआड काम करत आहेत. त्याविषयी जो काही निर्णय आहे तो पक्ष करेल. माझ्यावर अन्याय झाला असे कांदोळकर यांना मी सांगितलेले नाही, ते दिशाभूल करत आहेत.

स्व. मनोहर पर्रीकर असताना ते सर्वांना समजावत त्यामुळे पक्षात वाद होत नसत. त्यांची उणीव आज जाणवते. मात्र पक्षांतील वाद असल्यास ते पक्षाच्या मंचावरच सोडवावेत. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सर्वांना समजून घेतल्यास असे वाद होणार नाहीत. असे पक्षात घडत राहील, अशी अपेक्षा आहे असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

संबंधित बातम्या