इंधन, गॅस बचतीबाबत जनजागृती हवी, रोलंड मार्टिन यांचे मत

Dainik Gomantak
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पणजी, 
भविष्‍यात वाढती महागाई पाहता इंधन आणि गॅस बचतीबाबत जगजागृती होणे अत्‍यंत आवश्‍‍यक झाले. या गोष्‍टींचे दर अधिक प्रमाणात भडकले तर आहेतच. पण भविष्‍यात जर हे दर अधिक भडकले तर ते सर्वसामान्‍य आणि गरीब जनतेला परवडणारे नाहीत. सध्‍या आर्थिक मंदीचे सावट अख्‍या जगावर पसरले आहे, अशात आपणही काळजीने राहणे गरजेचे आहे. त्यामुळे गॅस आणि इंधन यांची बचत करणे हेच या गोष्‍टींचे संवर्धन करण्‍यासारखे असून से करणे आता काळाची गरज झाली असल्‍याचे मत गोवा कॅनचे रोलंड मार्टीन्स यांनी व्‍यक्‍त केले. 

पणजी येथील गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्‍या सभागृहात गुरुवारी आयोजित सक्षम 2020 इंधन आणि गॅस संवर्धन जागृती कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यावेळी रोलंड मार्टीन्स बोलत होते. व्यसपीठावर पेट्रोलियम कंझर्व्हेशन रिसर्च संघटनेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम 16 ते 15 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. या दरम्यान गॅस आणि इंधनबचत कशी करायची याबाबत माहिती दिली जाणार आहे, शिवाय विविध जागृती उपक्रम हाती घेण्यात येतील. समारोप सोहळ्याला नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री गोविंद गावडे यांची उपस्थिती असणार आहे.
सार्वजनिक वाहनांचा वापर करण्‍याऐवजी हल्‍ली लोक त्‍यांच्‍याकडे असणार्‍या खाजगी वाहनांचा वापर करताना दिसून येतात. गोव्‍यातील परिस्‍थती पाहता येथे लोकांपेक्षा अधिक वाहनांची संख्या अधिक आहे. तसेच दरवर्षी सुमारे 30 हजारपेक्षा अधिक वाहने विकत घेतली जात असल्‍याचे नोंदणी सांगते. गोव्‍यात दरवर्षी सुमारे 60 ते 70 लाख पर्यटक दरवर्षी येतात. त्यामुळे पर्यटक खात्याने यात लक्ष दिले पाहिजे. इंधन बचतीसाठी काळजी घेतली पाहिजे असे मार्टीन्स म्हणाले.
 
संबंधित बातम्या