Goa, Bramhouttsav
Goa, Bramhouttsav Dainik Gomantak
वेब स्टोरीज

Goa: ब्रह्मदेवाच्या ब्रह्मोत्सवाला प्रारंभ; भाविकांची गर्दी,धार्मिक कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

Goa: गोव्यात एकमेव असलेले ब्रह्मकरमळी स्थित सृष्टीकर्ता परमपिता श्री ब्रह्मदेवाचा वार्षिक ‘ब्रह्मोत्सवा’ला कालपासून उत्साहात प्रारंभ झाला. हा उत्सव 14 डिसेंबरपर्यंत ब्रह्मदेव देवस्थान ब्रह्मकरमळी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ब्रह्मोत्सवाला खंड पडला होता. त्यामुळे काल हजारोंच्या संख्येने भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

यंदाच्या ब्रम्होत्सवात आज पहिल्याच दिवशी सुमारे साडेतीन हजार भक्तगणानी महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे यंदा महाप्रसाद भक्तगणांनी केळीच्या पानावर घेऊन जमिनीवर बसून ग्रहण केला. ब्रह्मदेवाचे दर्शन घेण्याची व्यवस्था अत्यंत चोख आणि शिस्तबद्ध होती. मात्र, संध्याकाळी अचानक पडलेल्या पावसामुळे काही प्रमाणात भाविकांची तारांबळ उडाली होती.

सकाळच्या सत्रात जवळपास 40 ते 50 ब्रह्मवृंदांनी शास्त्रोक्तपद्धतीने महारुद्र अनुष्ठान पूर्ण केले. दुपारी सार्वजनिक प्रार्थना झाली. प्रार्थनेमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच गावाच्या हितासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर विविध पुजा, भाविकांतर्फे नवस फेडणे, ओटी भरणे व महाप्रसाद झाला.

ब्रह्मोत्सव दिनदर्शिकेचे प्रकाशन: ब्रह्मकरमळी येथील ब्रह्मदेवाच्या ब्रह्मोत्सवात रविवारी (ता. 11) ब्रह्मोत्सव दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन संदीप केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मिलिंद गाडगीळ, वामनराव देसाई, ॲड. शिवाजी देसाई, पराग खाडिलकर, प्रसाद खाडिलकर, रामचंद्र देसाई, सखाराम देसाई, विश्वनाथ पिंगुळकर व उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa AAP: डेटा घेऊन या! ईडीने पालेकरांकडे मागितली माहिती, 'आप' नेत्यांची चौकशी सुरु

MGNREGA Wages Hikes: मनरेगा अंतर्गत वेतनात मोठी वाढ; गोव्यात मजुरी दरात सर्वाधिक वाढ, कोणत्या राज्यात किती वाढ?

''कोठडीत असताना पद सोडावं लागेल, असं कुठं लिहिलंय''; केजरीवालांना CM पदावरुन हटवण्याची याचिका HC ने फेटाळली

Goa And Konkan Today's Live News Update: डेटा घेऊन या! ईडीने पालेकरांकडे मागितली माहिती

काँग्रेस पक्षाला मोठा झटका! आयटीला द्यावे लागणार 523 कोटी? दिल्ली हायकोर्टाने फेटाळली याचिका

SCROLL FOR NEXT