विल्सन गुदिन्हो यांना अटकपूर्व जामीन मंजूर

court bail
court bail

पणजी:विल्सन गुदिन्होंना अटकपूर्व जामीन फेटाळला
प्रधान सत्र न्यायालयाचा निर्णय : तपासकाम प्राथमिक टप्प्यात
मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील संशयित विल्सन गुदिन्हो याचा अटकपूर्व जामीन अर्ज आज प्रधान सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी फेटाळला. तपासकाम प्राथमिक टप्प्यात आहे व तपास अधिकाऱ्यांना तपासकामासाठी वेळ हवा आहे, असा दावा पोलिसांनी केला होता. तो न्यायालयाने उचलून धरला आहे. या निर्णयानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे तर दुसरा संशयित ताहिर हा सध्या फरारी आहे.
प्रकाश नाईक यांनी स्वतःवर गोळी झाडून घेण्यापूर्वी मोबाईलवरून व्हॅट्सअपवर मेसेज ग्रुपवर पाठविली होती.त्या मेसेजमध्ये विल्सन गुदिन्हो व ताहीर या दोघांच्या सतावणुकीमुळे व ब्लॅकमेलमुळे आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे त्यात नमूद केले होते व मृत्यूस या दोघांना जबाबदार धरण्यात यावे असे स्पष्ट म्‍हटले होते. नाईक यांनी या दबावामुळेही मृत्यूला कवटाळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्याचा तपास करण्यासाठी संशयितांची कोठडी आवश्‍यक आहे.

उच्च न्यायालयात आव्हान देणार
अर्जदार विल्सन गुदिन्हो हे अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित होते.मात्र, आज निकालाच्या दिवशी ते अनुपस्थित राहिले.न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अर्जदाराचे वकील रोहित ब्रास डिसा यांनी या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले जाणार असल्याची माहिती दिली.

मेसेजमुळे आले अडचणीत
मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांना आत्महत्‍याप्रकरणी संशयित व त्याचा मित्र मेरशी येथील जमिनीचा विकास करण्याचा प्रयत्न करत होते व हे प्रकरण पंचायत खात्यासमोर आहे.मयत प्रकाश हे पंचसदस्य असल्याने तेसुद्धा या प्रकरणाशी संबंधित होते.ही सतावणूक कशामुळे सुरू झाली त्याचे कारणही मेसेजमध्ये आहे. संशयित हा मंत्र्यांचा भाऊ असूनही पोलिसांनीही प्रामाणिकपणे तपास सुरू केला आहे.त्यामुळे संशयिताला याक्षणी अटकपूर्व जामीन देणे योग्य नाही, त्यामुळे तो फेटाळण्यात यावा अशी बाजू सरकारी वकील पूनम भरणे यांनी मांडली.
अर्जदार (संशयित) विल्सन गुदिन्हो यांच्यातर्फे ॲड. रोहित ब्रास डिसा यांनी बाजू मांडताना सांगितले की, अर्जदाराने प्रकाश नाईक यांच्याशी काहीच संबंध नाही.प्रकाश नाईक यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्हॉट्‍सॲपवरील मेसेज सोशल मडियामध्ये व्हायरल झाला होता.त्यामुळे जुने गोवे पोलिस ठाण्यावर अर्जदार गेला होता.त्याने पोलिसांना आपली जबानी नोंदवून घेण्याची विनंती केली होती.मात्र, पोलिसानी त्याच्याविरुद्ध गुन्हा नसल्याने जबानी का नोंदवायची, असा प्रश्‍न करून परत पाठवले होते.त्यानंतर दोन दिवसांनी प्रकाश नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने अर्जदाराने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. अर्जावरील
सुनावणीवेळी अर्जदार न्यायालयात उपस्थितही राहिला होता.अर्जदार हा मंत्र्यांचा भाऊ असल्याने त्याची प्रतिमा बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी बाजू डिसा यांनी मांडली होती.दोन्ही पक्षानी मांडलेल्या युक्तिवादानुसार व सादर केलेल्या कायद्यातील निवाड्यांनुसार हा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे माझे मत झाले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com