संशयित विल्सन गुदिन्हो याच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

प्रकाश नाईक मृत्यूप्रकरण
संशयिताच्या वकिलांनी उत्तर देण्यास वेळ घेतल्याने ही सुनावणी ११ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.

आतापर्यत पोलिसांनी संशयित विल्सन गुदिन्हो याच्या मालमत्तेसंदर्भातची चौकशी सुरू असून अनेकांच्या जबान्या नोंदविण्याचे काम सुरू आहे.

पणजी : मेरशी पंच प्रकाश नाईक यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासकामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज असमाधान व्यक्त केले. नाईक यांची बहीण अक्षया गोवेकर हिने संशयित विल्सन गुदिन्हो याच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करणारे लेखी माहिती दिली आहे.

या लेखी माहितीसोबत अनेक निवाड्यांचा हवाला दिला आहे. सत्र न्यायालयाने संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तो फेटाळण्यात यावा. मात्र संशयितांच्या वकिलांनी पोलिसांनी केलेल्या तपासकामाबाबत अनेक त्रुटी उघड केल्या आहेत व हस्तक्षेप अर्जदार अक्षया गोवेकर यांनी केलेल्या माहितीची तपास यंत्रणा असताना आवश्‍यकता नाही अशी बाजू मांडण्यात आली होती.

मयत प्रकाश नाईक याने मृत्यूपूर्वीच्या व्हॅटस्अप मेसेजमध्ये गुदिन्हो याचे नाव नमूद करताना मालमत्ता व्यवहारासंदर्भातचा संदर्भ दिला आहे. संशयिताची पोलिस कोठडी आवश्‍यक आहे. तपासकामात समोर आलेल्या काही दस्तऐवजांची चौकशी संशयित याच्या उपस्थितीत करण्याची गरज आहे. तपासकामाचा दस्तऐवज गोवा खंडपीठाला सादर केलेला आहे असे सरकारी वकील प्रवीण फळदेसाई यांनी सांगितले. यावेळी गोवा खंडपीठाने तोंडी निरीक्षण करताना सांगितले की पोलिसांनी तपासकामाची जी मोठी फाईल तयार केली आहे त्यातून केलेल्या तपासकामाचा अंदाज आला आहे.

 

 

 

वेस्टर्न बायपास बाबत खंडपीठाचे खडे बोल

संबंधित बातम्या