ऋतू बदलतान होणारी सर्दी

Winter cold and sneeze
Winter cold and sneeze

आरोग्यायण : ऋतू बदलाच्यावेळी सामन्यतः सर्वांनाच सर्दीच्या त्रासाला समोरे जावे लागते. विशेषतः लहानमुलांना हा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. सामन्य वाटणाऱ्या मात्र अतिशय त्रासदायक असलेलल्या या आजारावरील उपाययोजना आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

सर्दीची प्रमुख लक्षणे म्हणजे नाक चोंदणे अथवा वाहणे, शिंका येणे, डोकेदुखी, कधी कधी ताप येतो, आवाज बसतो व अंगदुखी. यामुळे मुले चिडचीड करतात.

प्रतिबंधनात्मक उपाययोजना म्हणजे ऍलर्जिक पदार्थांपासून मुलांना दूर ठेवणे, तसेच ऋतुबदलांनुसार अथवा थंडी संरक्षण म्हणून होते. नाका चोंदलेले असल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी. घसा दुखत असल्यास कोमट पाण्याचे गुळण्या कराव्यात. प्राथमिक स्वरुपातील सर्दीसाठी होमिओपॅथीक औषधे पुढीलप्रमाणे आहेत. पण ती होमिओपॅथीक तज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.

खोकला हा आजार नसून लक्ष्मण आहे, असे म्हणता येईल. खरतरं खोला ही शरीराची संरक्षणात्मक क्रिया असून याद्वारे श्‍वसनमार्गातील जंतू फुफ्फुसातून सोडलेल्या हवेच्या दाबाने बाहेर टाकले जातात. यामध्ये तीन क्रिया होतात.

प्रथम श्‍वास घेतला जातो., फुफ्फुसातील दबलेली हवा कंठद्वारातून एकदम व मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची क्रिया, एक विशिष्ट आवाज याने खोकला दर्शित होतो.

घशातील अंतर्त्वचेला दाह व सूज आल्याने जंतुसंसर्गाने, धुम्रपान, दूषित हवेचे श्‍वसन, दमा, दीर्घकालीन ब्रॉन्कायटीस, फुफ्फुसाचा कर्करोग इत्यादीसारखी अनेक कारणे खोकला येण्यास कारणीभूत ठरतात.

खोकला हा रोग नसून घसा व फुफ्फुसाची बिघडलेली परिस्थिती सांगणारी अवस्था असल्याने औषधोपचार घेण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य कारण लक्षणांमागचे मूळ कारण समजणे व आजारात योग्य उपचार वेळेत मिळणे खूप आवश्‍यक असते.

मुलांमध्ये रेस्पिरेटरी कारणं : आसपासचे वातावरण :
मुलांमध्ये रेस्पिरेटरी इन्फेक्‍शन वाढण्यासाठी अनेक प्रकारचे जिवाणू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
एखादी व्यक्ती खोकला, सर्दी, इत्यादीने ग्रस्त असेल तेव्हा त्यांच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून हा व्हायरस अन्य लोकांमध्येही पसरू शकतो. मुलांना हा आजार लवकर जातो.

साफसफाईची काळजी घ्यावी :
साफसफाईची व्यवस्थित काळजी न घेणे हे ही संसर्गाचे प्रमुख कारण आहे. जर मुल अगदी लहान असेल तर त्याच्या डायपर आणि कपड्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.
अनेकदा लघवी इत्यादी व्यवस्थित स्वच्छ न केल्यानेही ही समस्या उद्‌भवू शकते.
पावसात भिजणे मुलांना पावसात खेळायला आणि निजायला आवडते. कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही त्यांना कधी कधी भिजण्यासाठी अडवू शकत नाही. अशा वेळी जर मुलांची रोगप्रतिकारक्षमता मजबूत नसेल तर इन्फेक्‍शनची समस्या उदभवते व मुले या आजाराला बळी पडतात.

असे करावे उपाय :
रेस्पिरेटरी इन्फेक्‍शनपासून बचावासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
आपल्या आसपास आणि विशेषत: आपल्या वस्तू जसे कपडे, रुमाल इत्यादी स्वच्छ ठेवावीत.
तुळस आणि मध दोन्ही औषधी असून शरीरासाठी उपयोगी आहेत. तुळशीमध्ये संसर्ग कमी करण्याचे गुण आढळतात. तर मधामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. रेस्पिरेटरी इन्फेक्‍शनमुळे घशाला खवखव किंवा आज जाणवते ही सामान्य समस्या आहे.
यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने आराम मिळतो.

होमिओपॅथिक उपचार :
होमिओपॅथीक औषधे अत्यंत गुणकारी, रोग्याला दिलासा देणारी आणि जलद रोगमुक्ती घडवून आणणारी आहेत. होमिओपॅथीक औषधे लहान मुले, कोणत्याही वयाच्या स्त्री किंवा पुरुषाला होणाऱ्या नवीन व जुनाट रोगांवर उपयुक्त आहेत. ते ही कुठलेही दुष्परिणाम न होता.
त्याचबरोबर होमिओपॅथीक लहान मुलांमध्ये यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि त्यांना पूर्णपणे सुदृढ बनवते. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे मग पुन्हा त्यांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास उद्‌भवत नाही व त्यांचे स्वास्थ निरोगी राहते. परंतु डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळ न चुकता औषधे घेतली पाहिजेत. आरोग्य जपणे आणि आजार दूर ठेवण्याच्या दृष्टीने होमिओपॅथीक उपचार केले जातात. जेणेकरून रोगावर समूळ उपचार केला जातो.

सर्दी खोकला यांवर अनेक होमिओपॅथीक औषधे आहेत पण क्‍लासिकल होमिओपॅथीक रितीने जर ट्रीटमेंट केला तर या उपचार पद्धतीचा शरीराला साकारात्मकरित्या उपयोग होऊ शकतो. होमिओपॅथी सगळ्यांसाठीच एक उत्तम पर्याय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com