विर्डी दोडामार्ग येथे वीज वहिनी पडून महिलेचा मृत्यू  

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पर्ये:विर्डी दोडामार्ग येथे वीज
वहिनी पडून महिलेचा मृत्यू
केरी-सत्तरीपासून जवळच असलेल्या गोव्याच्या सीमेलगतच्या दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे काजू बागायतीत काम करण्यासाठी गेलेल्या येथील गीतांजली गुरूदास चोर्लेकर (४४) यांच्या अंगावर जिवंत वीज वाहिनी पडून जागीच जळून खाक झाल्याची घटना घडली.

रविवारी २६ रोजी सदर महिला व इतर काहीजण विर्डी येथील काजू बागायतीमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या.काम करून झाल्यावर घरी जाण्यापूर्वी पाणी पिण्यासाठी दगडावर बसल्या असताना ११ केव्हीची वीज वाहिनी अचानक तुटून त्या महिलेच्या अंगावर पडली.त्यात पूर्ण पणे जळून गेले व तिचा त्यात मृत्यू झाला.त्यावेळी तिच्या सोबत असलेली महिला काही प्रमाणात भाजली पण सुदैवाने बचावली.तिच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेची माहिती दोडामार्ग पोलिस स्थानकात तसेच वीज महावितरण यांना दिली. त्यानंतर यंत्रणा येथे उशिरा दाखल झाली व घटनेचा पंचनामा केला.त्यांच्या पश्चात्य पती गुरुदास चोर्लेकर असा परिवार आहे.

संबंधित बातम्या