पेडण्यात चौपदरी मार्गाचे काम सुरू

dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

पेडणे

कोरोना महामारीमुळी जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्याच्या काळानंतर पेडणे तालुक्यातील चारपदरी मार्गाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. परंतु यंदाच्या पावसाळ्यातही वाहनचालकांना या मार्गावरून खड्ड्यांतूनच प्रवास करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

पेडणे

कोरोना महामारीमुळी जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्याच्या काळानंतर पेडणे तालुक्यातील चारपदरी मार्गाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. परंतु यंदाच्या पावसाळ्यातही वाहनचालकांना या मार्गावरून खड्ड्यांतूनच प्रवास करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू झालेल्या या चारपदरी मार्गाचे काम ज्या वेगाने व्हायला हवे होते त्या वेगाने झाले नाही. राष्ट्रीय महामार्ग १७ असलेल्या या चारपदरी मार्गाचे काम हाती घेतले तरी त्या अगोदर काही वर्षे बऱ्याच भागात पुन्हा हॉटमिक्स डांबरीकरण न झाल्याने व त्यानंतर चारपदरी मार्गाचे काम सुरुरू झाल्यावर त्याची दुरुस्ती न झाल्याने अनेक ठिकाणी मार्गाची स्थिती भयानक झाली आहे. आतापर्यंत चारपदरी मार्गाचे सुमारे चाळीस टक्केच काम झालेले आहे. पत्रादेवी ते तोर्सेपर्यंत मार्गाचे खोदकाम सुरू आहे. जैतीर उगवे ते पोरस्कडे पंचायत, मालपे येथे काही भाग अर्धवट स्थितीत, तर सुकेकुळण धारगळ ते पुढे मधेमधे चारपदरी मार्गाचे काम सुरू झाले नसले, तरी पूर्वीच्या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण किंवा दुरुस्ती न झाल्याने रस्ता उखडून गेलेला आहे.
अगोदरच संथगतीने काम सुरू असताना कोरोनाच्या महामारीमुळे दीड महिनाभर काम बंद राहिल्याने चारपदरी मार्गाचे काम आणखी अडून रहाण्यात भर पडली आहे. चारपदरी मार्गाचे काम सुरू केल्यानंतर सर्वत्र खड्डेमय व उखडून गेलेल्या रस्त्यामुळे वाहनांची मोडतोड होऊन नुकसान तर होतेच, शिवाय अपघातातही वाढ होत आहे. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेकांचे बळीही गेलेले आहेत. त्यातच पावसाळ्यात या मार्गाची आणखी दुरावस्था होऊन त्यावरून प्रवास करणे एक दिव्य ठरणार आहे. चारपदरी मार्गाच्या कामाला प्रारंभ झाल्यापासून यंदा तिसऱ्या पावसाळ्यातून प्रवास करण्याच्या दिव्याला सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित बातम्या