मूत्रपिंडाच्या आजाराने जगात सर्वाधिक मृत्यू : डॉ. लेंगडे

डॉ. शीतल लेंगडे
गुरुवार, 12 मार्च 2020

पणजीः आंध्र प्रदेश आणि ओडिसाबरोबर गोव्यात मूत्रपिंडाच्या म्हणजेच किडनीच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे. भारतातील विशेषत: किनारपट्टी राज्यातील ग्रामीण भागात जागरूकता नसणे, तसेच पिण्यासाठी अयोग्य पाणी आणि पर्यावरणीय विषाणू यामुळे गैर-संसर्गजन्य आजारांत वाढ होत आहे. जागतिक किडनी दिनापूर्वी हेल्थवे हॉस्पिटलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत गोव्यातील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. शितल लेंगडे यांनी सांगितले की, मूत्रपिंडाचा आजार (सीकेडी), हे जगातील सर्वात अधिक मृत्यूंमागचे कारण आहे आणि आता या आजाराची भिती गोव्यातही आहे.

गोव्यातील ग्रामीण भागात, सीकेडीबद्दलची ३० टक्के प्रकरणे मुख्यत: पर्यावरणीय घटकांशी निगडित आहेत, जसे की हायड्रेशन सवयी, पाण्याबाबतची कमतरता आणि आर्सेनिक, कॅडमियम, अज्ञात अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांसारखे उच्च खनिज पदार्थ असल्याचे ओल्ड गोवा आणि पणजी येथील हेल्थवे हॉस्पिटलमधील डॉ. शीतल लेंगडे यांनी सांगितले. ग्रामीण भागात सीकेडी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जागरूकता नसणे हे आहे. गोव्यामध्ये उपलब्ध असणारी वैद्यकीय सुविधा शहरी व ग्रामीण दोन्ही भागात अतिशय चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील शहरी भागांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही कारणे म्हणून मूत्रपिंडाच्या आजाराची सामान्य कारणे म्हणून ओळखली जातात. ज्यात अनुक्रमे ३०- ३५ टक्के आणि २० टक्के प्रकरणे आढळतात, जी आरोग्याशी निगडित चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजाराचा सामना करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मूत्रपिंड निरोगी राहण्यासाठी फायदेशीर असे कोणतेही विशिष्ट खाद्यपदार्थ नाहीत. मात्र, निरोगी संतुलित आहारामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. राज्याचे प्रमुख गोवा मेडिकल कॉलेज व रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण नेफरोलॉजिस्ट म्हणून काम करणारे
डॉ. लेंगडे यांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तींना वारंवार किडनी स्टोनचे आजार होतात किंवा युरीक ॲसिडची पातळी जास्त असते अशा व्यक्तींनी खबरदारीचा उपाय म्हणून शेलफिश, कोळंबी आणि खेकडे खाणे टाळावे.

ते म्हणाले, मासे खाणे हा एक आरोग्यासाठी चांगला पर्याय आहे. गोव्याच्या पाककृतीमध्ये नारळाचा समावेश आहे, ज्यामध्ये सीकेडी असलेल्या रूग्णांमध्ये हृदयरोग आणि उच्च पोटॅशियमची पातळी कमी करण्याची क्षमता आहे. नियमित व्यायाम, योग्य आहार करणे, भरपूर पाणी पिणे, धूम्रपान न करणे, तसेच पेन किलर आणि इतर औषधे वापरण्यावर मर्यादा आणल्यास सीकेडीला दूर ठेवण्यासाठी मदत होऊ शकते, असेही ते म्हणाले.

हेल्थवे हॉस्पिटलला आता किडनी ट्रान्सप्लांट सेंटर म्हणून मान्यता मिळाली आहे. हेल्थवे हॉस्पिटलने खासगी क्षेत्रातील पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र सुरू केले असून मागील ६ महिन्यांत ६ प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले आहेत. कॅडव्हर किडनी प्रत्यारोपणासाठी दाखल झालेल्या रूग्णांसाठी हेल्थवेने एक वेटलिस्ट देखील सुरू केली आहे. जिवंत दाता प्रत्यारोपणासाठी आणखी ४ रुग्ण प्रतीक्षेत आहेत.

संबंधित बातम्या