१ फेब्रुवारी रोजी जागतिक ओलित क्षेत्र दिवस

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पणजी:गोवा राज्‍य ओलित क्षेत्र प्राधिकरणातर्फे १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते संध्‍याकाळी ४.३० वाजेपर्यंत दोनापावल येथील राष्‍ट्रीय सागर संस्‍थेच्‍या डॉ. एस. झेड. कासिम ऑडिटोरियममध्‍ये जागतिक ओलित क्षेत्र दिवस साजरा करण्‍यात येणार आहे.

पर्यावरणमंत्री तथा गोवा राज्‍य ओलित क्षेत्र प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नीलेश काब्राल यावेळी उपस्‍थित राहणार आहेत. पर्यावरण खात्‍याचे संचालक आणि सदस्‍य सचिव जॉन्‍सन फर्नांडिस आणि राष्‍ट्रीय सागर संस्‍थेचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंग सन्‍माननीय पाहुणे म्‍हणून उपस्‍थित राहतील.मुंबईतील लिमनोलॉजिस्‍ट डॉ. प्रमोद सालसकर हे पवई सरोवरातील आपल्‍या अभ्‍यासाची माहिती देतील.त्‍याचप्रमाणे ओलित क्षेत्र आणि जैवविविधता या संकल्‍पनेवर निबंध लेखन स्‍पर्धेचे आयोजन केले आहे.

संबंधित बातम्या