विविध ठिकाणी ‘म्हादई’ कलशाचे पूजन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

औदुंबर देवस्थानात ‘म्हादई’माता कलशाचे पूजन करताना दाम्पत्य

प्रभू मंदिरात ‘म्हादईमाता’ कलश पूजन कार्यक्रमात सहभागी झालेले नागरिक

वागाळी कामुर्ली येथे ‘म्हादई’ कलशाचे पूजन

 वागाळी-कामुर्ली येथील प्रभू मंदिरात नुकतेच ‘म्हादईमाता कलशा’चे पूजन करण्यात आले. यावेळी प्रुख पाहुणे म्हणून वसंत केळकर उपस्थित होते.

कुचेली : संस्कार व संस्कृतीचे जतन करणे काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही संस्कृती जतन करू शकलो नाही, तर येणाऱ्या भावी पिढाला आपण तोंड दाखवू शकणार नाही. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुऴे कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी वळवल्यामुळे याचे परिणाम पुढील पिढीली भोगावे लागणार आहेत. त्यामुळे आता लोकांनी वेळीच जागृत होणे गरजेचे आहे.

म्हादई कलशाचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी यजमान म्हणून अनिल साळगावकर व गौरासी अनिल साळगावकर उपस्थित होते. यावेळी आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंदिर समिती व सगुण प्रभू यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हापसा औदुंबर देवस्थानात
‘म्हादई’ कलशाचे पूजन

 गावसवाडा-म्हापसा येथील श्री औदुंबर देवस्थानात रविवारी (ता. २३) म्हादईमाता कलशाचे पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सहा दाम्पत्यांनी म्हादईमाता कलशाचे पूजन केले.

कलश पूजन सोहळ्यात मंदिराचे अध्यक्ष श्री. व सौ. मिथीला मनोज गडेकर, श्री. व सौ. सुहासिनी प्रसाद केरकर, श्री. व सौ. रेश्मा राजेंद्र मावळणकर, श्री. व सौ. निलेश चिखलीकर, श्री. व सौ. उज्वला समीर पाळणी आणि श्री. व सौ. कृष्णा सातार्डेकर यानी पूजन केले. पूजनाचे पौरोहित्य श्री विकास आपटे यांनी केले. तर पूजनाचा हेतू स्पष्ट करताना म्हादई संदर्भातचा विषय वाळपईचे श्री संकेत जोशी यांनी मांडला.कार्यक्रमाला स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्ही निसर्गाचे पूजक आहोत. म्हदईचे पाणी वळवून कर्नाटकात नेऊन निसर्गाची जी हानी होणार आहे, त्याचा विरोध आपण सर्वांनी केला पाहिजे आणि म्हादईचे पूजन करून सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे, असे उपस्थितांनी सांगितले.
 

पंचायत आरक्षणाविरोधात आव्‍हान

 

संबंधित बातम्या

फोटो फीचर